मुंबईत पहिली नॉन एसी ऑटोमॅटिक दरवाजांची लोकल दाखल
सुमारे ५,७०० प्रवासी क्षमता
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक सुविधा
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या ताफ्यात एका नव्या ट्रेनचा समावेश झाला आहे. भारतातील पहिली स्वयंचलित दरवाजा बंद होणारी नॉन एसी लोकल मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. विना-एसी स्वयंचलित दरवाजांची (Automatic Door-Closing) लोकल ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत निर्मित करण्यात आली आहे. ही नवीन ट्रेन सुरक्षित तर आहेच शिवाय प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीनेही अत्यंत आधुनिक आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ट्रेनचा सांगाडा हा एसी लोकलचा आहे. तसेच काही उपकरणदेखील एसी लोकलचीच आहेत. परंतु यात सर्वात मोठा बदल करण्यात आलाय आणि तो म्हणजे यातील आसन व्यवस्था. यातील आसनसंख्या कमी करून उभ्या प्रवाशांसाठी जागा वाढवण्यात आली आहे.
आता रुळावर धावणाऱ्या लोकलमध्ये ९०० मिमीच्या खिडक्या आहेत. आता या नव्या ट्रेनमध्ये १९०० मिमीच्या मोठ्या खिडक्या आहेत. यामुळे डब्यात जास्त उजेड आणि हवा येईल. डबे बंद असूनही हवा खेळती राहण्यासाठी प्रत्येक डब्यात दोन हाय-कॅपॅसिटी ब्लोअर्स लावलेत. जे दर तासाला १० हजार घनमीटर हवा पुरवतील.
या लोकलचे लगेज डबे सध्याच्या लोकलपेक्षा दुप्पट मोठे आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी दोन सीटमध्ये जास्त जागा देण्यात आली आहे. डब्यातील रस्ताही रुंद करण्यात आला आहे. प्रवाशांना उभे राहण्यास मुबलक जागा देण्यात आली आहे. लोकलला मोठ्या खिडक्या, लुव्हर असलेले दरवाजे. आणि १२ डब्यांच्या रचनेत ३ व्हेस्टिब्यूल कोचेस असतील यात १,००३ आसने आहेत.
नवीन नॉन एसी १२ डब्यांच्या लोकलमध्ये एकूण १९ कम्पार्टमेंट आहेत. यात फर्स्ट क्लास, लेडीज फर्स्ट क्लास, दिव्यांगांसाठी विशेष डबे, महिलांसाठी सेकंड क्लास, सामानासाठी डबे आणि सर्वसाधारण सेकंड क्लास अशा विविध श्रेणींचा समावेश आहे. या गाडीत एक अतिरिक्त फर्स्ट क्लास डबा देण्यात दिलाय. १२ डब्यांची रचना तीन भागांत विभागली आहे. एक ६ डब्यांचा आणि दोन ३-डब्यांचे स्वतंत्र विभाग आहेत. पहिल्या सहा डब्यांमध्ये फर्स्ट आणि सेकंड क्लास तसेच लगेज विभाग असेन. तर उर्वरित विभागांमध्येही फर्स्ट क्लास डबे असतील. एकूण ४ फर्स्ट क्लास डबे असतील.
सध्याचीः १,०२८ आसने / २,३३६ उभे
नवीनः १,००३ आसने / ४,६९५ उमे
सध्याचीः ९०० मिमी (पुश-डाउन)
नवीनः १९०० मिमी (स्लायडिंग)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.