संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai Gas Pipeline Burst News : पावसाळ्याच्या आधी मुंबईत सर्वत्र रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे करत असताना रस्ता कंत्राटदारांकडून काळजीपूर्वक कामे होणे अपेक्षित असते, मात्र मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील बॉन बॉन लेन परिसरात अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटली. जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदताना महानगर गॅस कंपनीची मुख्य गॅस लाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली.
सुदैवाने यात आगीची कोणतीही घटना घडली नाही. पण या घटनेमुळे मात्र परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत बॉणबोन लेन परिसरातील गॅस पुरवठा तात्काळ बंद केला आहे. मात्र यामुळे अडीच हजाराहून अधिक कुटुंबांना याचा फटका बसणार आहे.
मुंबईच्या विविध भागात रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच ही कामे संपवण्यासाठी पालिका अधिकारी आणि कंत्राटदार हे कोणत्याही परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदून नव्याने काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील बॉन बॉन लेन परिसरात ॲक्सिस बँके समोरील मुख्य रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने जुना रस्ता खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी जेसीबी चालकाकडून रस्त्याखालील मुख्य गॅस पाईपलाईन फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू होऊन ते हवेमध्ये पसरू लागला. शेकडो किलो गॅस वाया देखील गेला. यामुळे परिसरातील नागरिकांना गॅसच्या वासामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. सुदैवाने जिथे रस्त्याचे खोदकाम सुरू होते, त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन देखील फुटल्यामुळे आगीची दुर्घटना टळली. पण गॅस मोठ्या प्रमाणावर वाया गेला.
कंत्राटदार आर पी शाह इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू आहे. सुपरवायझर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांच्या हलगर्जीपणामुळेही पाईपलाईन कुठली आहे. महानगर गॅस कंपनीकडून तात्काळ या ठिकाणचा गॅस पुरवठा बंद करण्यात आला. मात्र याचा फटका सात बंगला वर्सोवा परिसरातील साडेतीनशे इमारतींना बसला. या साडेतीनशे इमारतीत राहणाऱ्या अंदाजे अडीच हजार कुटुंबांना मात्र आज गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. संबंधित कंत्राटदाराकडून महानगर गॅस कंपनीकडून रस्ता खोदकाम करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यामुळे अशा कंत्राटदारावर पालिकेच्या रस्ते विभागाने तात्काळ कारवाई करून झालेले नुकसान देखील आर पी शहा इन्फ्रा या कंत्राटदाराकडून वसूल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.