mumbai Crime Saam TV marathi News
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मध्यरात्री मुंबई हादरली! २७ वर्षाच्या फ्रेंच तरूणीसोबत नको ते केले, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

French tourist harassment case in Mumbai full details : बांद्रा-खार परिसरात २७ वर्षीय फ्रेंच तरुणीचा स्कूटरचालकाने विनयभंग केला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी जलद तपास करत २५ वर्षीय आरोपी सुनील वाघेला याला २४ तासांत अटक केली.

Namdeo Kumbhar

  • फ्रेंच तरुणीची स्कूटरचालकाने छेडछाड केली व घटनास्थळावरून पळ काढला.

  • पीडित ही फ्रेंच वाणिज्य दूतावासात कार्यरत असून मैत्रिणीला भेटून घरी जात होती.

  • तक्रार मिळताच पोलिसांनी BNS कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

  • सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास सुरू केला.

  • जलद तपासातून धारावीचा २५ वर्षीय सुनील वाघेला ओळख पटताच अटक केली.

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही

CCTV footage of French woman molestation in Bandra Khar : मुंबईमध्ये २७ वर्षाच्या फ्रेंच तरूणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरा‍त्री वांद्रे पश्चिम रस्त्यावर स्कूटरचालकाने फ्रेंच तरूणीसोबत अश्लील कृत्य छेडछाड केली अन् घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांनी आरोपीली २४ तासात बेड्या ठोकल्या अन् अटक केली आहे.

मुंबईतील फ्रेंच वाणिज्य दूतावासात ही तरूणी काम करत असल्याचे समोर आले आहे. पाली हिल येथे एका मैत्रिणीला भेटून चालत घरी निघाली होती. त्यावेळी स्कूटरचालकाने तिचा पाठलाग सुरू केला. खारमध्ये अचानक तिच्या शेजारी थांबला अन् विनयभंग केला. त्यानंतर तो तिथून निघून गेला असे पोलिसांनी सांगितले.

8 नोव्हेंबर रोजी खार (प.) परिसरात एका 27 वर्षीय फ्रेंच पर्यटक युवतीची छेडछाड झाल्याची गंभीर घटना घडली. परदेशी पर्यटकांशी संबंधित गुन्हा असल्याने पोलिसांनी ही तक्रार अत्यंत गंभीरतेने घेत तात्काळ तपासाला सुरुवात केली. तक्रारदार युवती बांद्रा (प.) येथे तात्पुरत्या वास्तव्यास होती. 8 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजता ती खार वेस्टमध्ये रस्त्यावरून पायी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने अचानक तिच्या जवळ थांबून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. धक्क्यातून सावरत तिने घटना लक्षात ठेवली आणि शनिवारी, म्हणजेच दुसऱ्या दिवशी, खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित ही परदेशी नागरिक असल्याने प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन खार पोलिसांनी विशेष पथकांची निर्मिती केली आणि तपासाला वेग दिला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. दुचाकीची हालचाल ओळखण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला, तसेच स्थानिक माहितीदारांकडून मिळालेल्या गुप्त माहितीचा आधार घेत संशयिताचा मागोवा घेण्यात आला. या जलद तपासामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले. अखेर 25 वर्षीय सुनील वाघेला (राहिवासी: धारावी) याला अटक करण्यात आली. घटनेतील गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. आगामी चौकशीसाठी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

Wednesday Horoscope : सर्व लाभ पदरात पडतील; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

दारू पिण्यासाठी बायकोची परवानगी न घेतल्यास नवऱ्याला जेल? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

वर्ध्यात DRIचं 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'; जंगलातील ड्रग्सचा कारखाना शोधला, १२८ किलो मेफेड्रोन जप्त

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले

SCROLL FOR NEXT