Datta Dalvi News Saam tv
मुंबई/पुणे

Datta Dalvi News: माजी महापौर दत्ती दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर केली होती आक्षेपार्ह टीका

Datta Dalvi News: मुंबईतून मोठं वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या भांडूपमध्ये दत्ता दळवी यांच्या कारची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Datta Dalvi Latest News:

मुंबईतून मोठं वृत्त हाती आलं आहे. मुंबईत माजी महापौर दत्ता दळवी यांच्या कारची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. या प्रकरणी दत्ता दळवी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी भांडुपमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ करत टीका केली होती. या टीकेनंतर माजी महापौर दत्ता दळवी यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता अज्ञातांकडून भांडुपमध्ये दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

दत्ता दळवी यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दळवी यांच्या घरासमोरील त्यांच्या गाडीची चार ते पाच अज्ञातांनी तोडफोड केली आहे. दळवी यांच्या गाडीची तोडफोड शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दळवींच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

तत्पूर्वी, दळवी यांच्या वक्तव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर हल्लाबोल सुरु केला आहे. दत्ता दळवी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत त्यांनी आक्षेपार्ह बोलले नसल्याचं म्हटलं आहे. तर धर्मवीर सिनेमातही आक्षेपार्ह बोललं गेलं असून त्यामुळे चित्रपट निर्मात्यांवर केली जावी, असं राऊत म्हणाले..

कोण आहेत दत्ता दळवी?

दत्ता दळवी यांनी मुंबईचं महापौरपद भुषवलं आहे. दत्ता दळवी यांची ईशान्य मुंबईत मोठी ताकद आहे. दळवी यांनी सेनेचं विभागप्रमुखपदाचं देखील काम पाहिले आहे. दत्ता दळवी यांनी २००५ ते २००७ या कालावधीत मुंबईचं (Mumbai) महापौरपद भुषवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT