Mumbai fishing Boat Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai fishing Boat Accident : मुंबईच्या मढ समुद्रात बोटीचा अपघात; मध्यरात्री घडलेला थरारक प्रसंग बोट मालकाने सांगितला

Mumbai fishing Boat Accident update : मुंबईच्या मढ समुद्रात बोटीचा अपघात झाला आहे. मध्यरात्री घडलेला अपघाताचा थरारक प्रसंग बोट मालकाने सांगितला. वाचा मध्यरात्री समुद्रात नेमकं काय घडलं?

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai sea accidents latest news :

मुंबईच्या कुलाबा गेटवे ऑफ इंडियाजवळ काही दिवसांपूर्वी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जहाजाचा अपघात होऊन काही निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा शनिवारी मध्यरात्री मुंबईच्या मढ समुद्रात मासेमारी करणऱ्या बोटीचा अपघात झाल्याची दुर्घटना घडली. तिसाई या मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहतूक करणाऱ्या जहाजाने जोरदार धडक दिल्यामुळे तिसाई बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवारी रात्री मुंबईच्या मढ येथील सहा मासेमारी करणारे कर्मचारी मढ समुद्रात मासेमारी करण्यासाठी तिसाई बोट घेऊन किनाऱ्यापासून 70 किलोमीटर आत गेले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात स्थिर उभी असताना अत्यंत वेगात आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या बोटीने तिसाई बोटीला जोरदार धडक दिली.

या बोटीची धडक इतकी जोरदार होती, ती मासेमारी करणाऱ्या बोटीला मोठे भगदाड पडले. या बोटीमध्ये पाणी शिरू लागल्यामुळे बोट पाण्यात बुडू लागली. मात्र मासेमारी करणाऱ्या बोटीवर असलेल्या सहा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत लोखंडाच्या साह्याने बोट दुसऱ्या बोटीला बांधून ठेवली. त्यानंतर दुसऱ्या बोटीतील मासेमारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवले.

धडक मारून मालवाहतूक करणारी बोट पसार

तिसाई बोट मासेमारी करण्यासाठी किनाऱ्यापासून 70 किलोमीटर आतमध्ये उभी असताना सर्व सिग्नल आणि बोटीवरील दिवे देखील सुरू होते. मात्र दारूच्या नशेत असलेल्या मालवाहतूक बोटीच्या चालकाने जाणीवपूर्वक मासेमारी करणाऱ्या बोटीला जोरदार धडक दिली. मदत न करता मालवाहतूक करणारी बोट त्या ठिकाणावरून प्रसार झाल्याचा आरोप मासेमारी करणाऱ्या बोटीचे मालक हरिश टिपरी यांनी केला आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारे मासेमारी करणाऱ्या बोटींचे अनेकदा अपघात झाले. याविषयी कोस्ट गार्ड नेव्ही आणि सागरी सुरक्षा बलाकडे तक्रार देखील केल्या सरकारकडे देखील या संदर्भात तक्रार केल्या. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे टिपरी यांनी सांगितले.

तब्बल आठ तास आपल्या जीवाशी खेळत मासेमारी करणाऱ्या बोटीतील कर्मचाऱ्यांनी बोट पाण्यात बुडण्यापासून वाचवली. यानंतर कोस्ट गार्डच्या सहकार्याने नऊ बोटीच्या मदतीने तिसाई बोटीला मढ बंद बंदरावर आणण्यात आले आहे. बोटीला धडक बसल्यामुळे मोठा भागदार पडले असल्याने आतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. हे पाणी काढण्याचे काम सध्या बोटीवरील कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. यासाठी पाच हॉर्स पावरचे दोन पंप देखील वापरण्यात आले आहेत. पाणी काढून झाल्यानंतर या बोटीची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती देखील बोटीचे मालक टीपरी यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT