Mumbai Fish Market Saam tv
मुंबई/पुणे

Video : मासे खवय्यांसाठी मोठी बातमी! बाजारात मासळीचे भाव अचानक गगनाला भिडले; काय आहे कारण?

मच्छिमारांसह मासे खवय्यांची चिंता वाढली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : तुम्ही मासे खवय्ये आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या समुद्राला बेभान उधाण आले आहे. मात्र, असे असताना देखील मच्छिमारांच्या जाळ्यात मासळीच सापडत नाहीत. यामुळे मच्छिमारांसह मासे खवय्यांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)

यावर्षी 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली असली तरी समुद्रात आलेल्या विविध संकटांमुळे मासेमारीचा हंगाम वाया गेला आहे. सध्या समुद्राला उधाण असले तरी नवी मुंबईसह (Navi Mumbai) रायगडच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने नौका परतल्या आहेत. रायगडच्या समुद्रात मासळीचा मोठा तुटवडा असून मासळीचे उत्पादन कमालीचे घटले आहे.

सध्या रायगडच्या समुद्रात छोटी मासळी देखील मिळणे दुरापास्त झाले असून सुरमई, रावस, पापलेट, जिताडा, घोळ अशी मोठी मासळी डोळ्यांनाही दिसेनाशी झाली आहे. मासळीचे उत्पन्न 50 टक्क्याहून अधिक घसरले असल्याने मासळी खवय्यांच्या ताटातून मासळीच गायब होण्याच्या मार्गांवर आहे.

मासळीची आवक घटल्याने मासळीचे दर देखील गगनाला भिडलेत. यामुळे मासे खवय्ये ग्राहकही मासळी बाजाराकडे पाठ फिरवत आहेत. शासनाकडूनही दुर्लक्ष होत असून ऐन मौसमात मासे का मिळत नाही याच प्रश्नाचे उत्तर खलाश्यांना सापडेनासे झाले आहे.

मासळीच्या शोधात गेलेला दर्याचा राजा आता खाली हात परतत असून यामुळे मासे खवयांच्या ताटातील मासळीच दुर्लभ होत चालली आहे.

मासे खवय्यांची चिंता वाढली

मासळींची (Fish) आवक घटल्याने मासळीचे दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मासळी खाणाऱ्या खवय्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. मासळीचे भाव वाढल्याने मासे खाणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT