Mumbai Driverless Metro News  AI Image
मुंबई/पुणे

Driverless Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; मार्ग आणि स्थानके कोणती?

Mumbai Thane Driverless Metro Update News : मुंबईत पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन डिसेंबर 2026 मध्ये मुंबईत दाखल होईल. तसेच ही मेट्रो 30 स्थानकांदरम्यान धावणार असल्याची माहिती.

Alisha Khedekar

  • मुंबईत धावणार पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो

  • डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मुंबईत दाखल होणार ट्रेन

  • मुंबई मेट्रो 4 आणि 4A प्रकल्पासाठी अल्स्टॉम एकूण 39 ट्रेनसेट पुरवणार

मुंबई आणि ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रो 4 आणि 4A साठी आधुनिक ‘मेट्रोपोलिस’ ट्रेन दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फ्रान्सची रेल्वे कंपनी अल्स्टॉमने 14 ऑक्टोबर 2026 रोजी आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील उत्पादन प्रकल्पात पहिल्या ट्रेनचे अनावरण केले. ही ट्रेन नोव्हेंबरच्या अखेरीस रवाना होण्याची आणि डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.ही ड्रायव्हरलेस ट्रेन असल्याची समोर आले आहे.

अल्स्टॉमकडून या प्रकल्पासाठी एकूण 39 ट्रेनसेटचा पुरवठा केला जाणार आहे. नव्या मेट्रो ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीलचेअरची सुविधा, सायकल ठेवण्यासाठी स्वतंत्र रॅक आणि एअरफ्लोवर आधारित कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, भारतातील त्यांच्या मेट्रो ट्रेनमध्ये पहिल्यांदाच सायकल रॅकची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या सुविधेमुळे सायकलसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या ट्रेनची क्षमता ताशी 90 किलोमीटर असून, प्रत्यक्ष ती ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणार आहे. ट्रेनच्या चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या असून,इतर तांत्रिक तपासण्या अद्याप बाकी आहेत. या प्रक्रियेसाठी आणखी तीन ते चार आठवडे लागू शकतात. मात्र, ट्रेन मुंबईत दाखल झाली म्हणजे लगेच प्रवासी सेवा सुरू होणार नाही. प्रवासी वाहतुकीपूर्वी रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) आणि कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) यांच्याकडून आवश्यक प्रमाणपत्रे आणि सुरक्षा मंजुरी मिळवावी लागेल. तसेच वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर ही ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माहितीनुसार, मेट्रो मार्गिका 4 हा 32.32 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग असून, तो वडाळा ते ठाण्यातील कासारवडवली यांना 30 स्थानकांद्वारे जोडणार आहे. मार्गिका 4A मुळे गायमुखपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास आणि प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांपर्यंत वाचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मेट्रो मार्गिका 2 आणि 7 वरील ट्रेनचा वापर करण्याची MMRDAची योजना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

Relationship Tips : रागाच्या भरात या गोष्टी बोललात, तर नातं संपायला वेळ लागणार नाही

Same Food Side Effect: तुम्हीही रोज एकच नाश्ता किंवा जेवण करता का? वाचा काय घडते तुमच्या शरीरात!

Shocking : नूडल्स खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Maharashtra News Live Update: नंदुरबार बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात

SCROLL FOR NEXT