Mumbai Fire Saam TV News
मुंबई/पुणे

Mumbai Fire : अंधेरीच्या आगीत ४५ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू, २ जणांची प्रकृती गंभीर

Andheri East chawl fire woman death : मुंबईतील अंधेरी पूर्वेतील चाळीत लागलेल्या आगीत ४५ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला. दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Andheri Fire News : मुंबईतील अंधेरी पूर्वमधील एका चाळीत लागलेल्या आगीमध्ये ४५ वर्षाच्या महिलेचा होरपळून मृत्यू झालाय. २१ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता चाळीत आग लागली. त्या आगीमध्ये ३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारावेळी ४५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. दोन जणांचा प्रकृती अद्याप गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Andheri fire victims in Kasturba Hospital )

गेल्या आठवड्यात अंधेरी पूर्वेतील विजय नगर, रमाबाई आंबेडकर नगर चाळीत भीषण आग लागली होती. या आगीत ३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामधील ४५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रविवारी नागरी अधिकाऱ्यांनी दिली. वीणा प्रदीप भोईटे असे ४५ वर्षीय महिलेचे नाव आहे.

२१ डिसेंबर रोजी सकाळी ७.१६ वाजता अंधेरी पूर्वेतील रमाबाई आंबेडकर नगर चाळीत भयंकर आग लागली होती. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुार, ग्राउंड प्लस वन चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १० मध्ये आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, पण घरातील कपडे आणि गादी यामुळे आग भडकली. अग्निशमन दलाने तासभरात या आगीवर नियंत्रण मिळवले होते.

अंधेरीतील या आगीमध्ये नामदेव सकपाळ आणि लक्ष्मी सकपाळ यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या कस्तुरबा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांनाही ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भांडूपमध्ये भीषण आग, घरमालकाचा मृत्यू

भांडुप भट्टीपाडा येथे १८ डिसेंबर रोजी एका खोलीमध्ये भीषण आग लागली होती. ही आग विझवताना शॉक लागून घर मालकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होत्या. अग्निशामक दल आग विझवत असताना घराचे मालक हरीशंकर पालीवाल हे मदत करत असताना त्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. फायर ब्रिगेडचे अधिकारी व पथक यांनी पालीवाल यांना जवळच्या बडवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण उपचाराआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

दादांनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे? पवार आणि राष्ट्रवादी समीकरण कायम राहणार?

Anjali Bharti: अमृता फडणवीसांवर बोलताना बरळलली, गुन्हा दाखल होताच ताळ्यावर आली! गायिका अंजली भारतींकडून दिलगिरी व्यक्त

Maharashtra Live News Update: शिरपूर पोलिसांची ‘धडाकेबाज’ कामगिरी; बसमधील प्रवाशाचे 50 हजार चोरणारा 4 तासांत गजाआडवाया

SCROLL FOR NEXT