mumbai fire news  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News : मुंबईत अग्नितांडव! कुर्ल्यात इमारतीला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू

मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरात एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.

जयश्री मोरे

मुंबई : मुंबईत अग्नितांडव सुरूच असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरात एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत इमारतीचे ६ मजले आगीच्या भस्मस्थानी सापडले आहेत. या आगीने भीषण रौद्ररुपधारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेलल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) कुर्ला पश्चिम परिसरात एसरा इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी आग (Fire) लागल्याची ही घटना घडली. या आगीत इमारतीचे ६ मजले भस्मस्थानी सापडले आहेत. आग इमारतीच्या १२ व्या मजल्यापर्यंत पसरली होती. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे आग लागल्यामुळे इमारतीतील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. चौथ्या मजल्यावर लागलेली आग ही १२ व्या मजल्यापर्यंत पसरली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन ही आग विझवली आहे.

या आगीत एका महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महिलेचे नाव शंकुतला रमानी असून त्या ७० वर्षांच्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. शंकुतला रमानी या आगीत होरपळल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शंकुतला रमानी यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मुंबईत काल मालाड पूर्वच्या जामरुशीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. या आगीत १०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. तर एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: डोकं शांत ठेवा! पैशांच्या अडचणी कमी होतील; वाचा आजचे राशीभविष्य

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

SCROLL FOR NEXT