Mumbai Juhu Fire News: Juhu Residency Hotel caught fire 4 vehicles of the fire brigade reached the spot  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: जुहू परिसरातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये अग्नितांडव; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल

Mumbai Juhu Fire News: अग्निशमन दलाकडून सध्या कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. मुंबईतील आगीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

Ruchika Jadhav

Fire Breaks Out Juhu Residency Hotel:

मुंबईतील जुहू परिसरात एका हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आलीये. जुहू रेसिडेन्सी असं हॉटेलचं नाव असून हॉटेलच्या टॅरेसवर आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,५ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील टॅरेसवर आगीने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की, धूराचे लोट हवेत दूरवर पसरले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अग्निशमनदालासोबतच आदानी इलेक्ट्रिसिटी कर्मचारी देखील घटनास्थळावर दाखल झाले होते. अदानी इलेक्ट्रिसिटीकडून हॉटेलचा वीजपुरवठा तातडने खंडित करण्यात आला.

सदर घटनेत आग विझवण्यात आता अग्निशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दलाकडून सध्या कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. मुंबईतील आगीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेक ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना समोर येतायत. रविवारी पुण्यात देखील आगीची मोठी घटना घडली होती.

सवाई गंधर्व महोत्सवात आग लागली होती. यामुळे कार्यक्रमात प्रेक्षकांची मोठी तारांबळ उडाली. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. कार्यक्रम सुरु असताना आग लागल्यानं कार्यक्रमात प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. मागे बसलेल्या प्रेक्षकांनी मंडपाच्या बाहेर देखील धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT