Mumbai Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Diwali Celebration: मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी भीषण आगीची घटना घडली. आग लागून इमारतीमधील एक घर जळून खाक झाले. जळता दिवा सोफ्यावर पडल्यामुळे ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • जोगेश्वरी पूर्वेकडील आदर्श मेघवाडी सोसायटीत दिवाळीच्या दिवशी भीषण आग

  • जळता दिवा सोफ्यावर पडल्याने घर जळून खाक

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

  • आगीमध्ये घराचे मोठे नुकसान

संजय गडदे, मुंबई

दिवाळीमध्ये आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी फटाक्यांमुळे तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगीच्या घटना घडल्या. नवी मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री ही घटना घडली. जळता दिवा सोफ्यावर पडल्यामुळे ही आग लागली आणि यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील आदर्श मेघवाडी सोसायटीत मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आगीमध्ये आठव्या मजल्यावरील एक घर पूर्णतः जळून खाक झाले. जळता दिवा सोफ्यावर पडल्याने आग लागली असून काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले.

स्थानिक रहिवाशांनी इमारतीतील फायर सिस्टीम बंद असल्याचा आरोप केला असून अलार्म वाजला नसल्याने आग उशिरा लक्षात आल्याचे सांगितले. आमदार अनंत नर यांनी घटनास्थळी भेट देत विकासकावर चौकशीची मागणी केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा विकासकांच्या जबाबदारीचा आणि सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, नवी मुंबईतल्या वाशीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये ८० वर्षांची वृद्ध महिला, ४० वर्षीय पूजा राजन, ४० वर्षीय सुंदर कृष्णन आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी वेदिका यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. रहेजा रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजता ही घटना घडली. या घटनेमध्ये १० जण जखमी झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली.

नवी मुंबईतील कामोठ्यातील सेक्टर -३६ मध्ये आगीची घटना घडली. अंबे श्रद्धा इमारतीमध्ये आग लागली यामध्ये मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला. रेखा शिशोदिया आणि पायल शिशोदिया अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावं होती. सिलेंडरचा स्फोट होऊन ही घटना घडली. या घटनेमुळे घराचे देखील मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट; वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर दाखल

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

SCROLL FOR NEXT