VIDEO Mumbai Fire Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire [VIDEO]: मुंबईतील भेंडीबाजार परिसरात 3 मजली इमारतीला भीषण आग; धुराचे लोट, आगीचे लोळ अन् नागरिकांची आरडाओरड

Fire At Mumbai's Bhendi Bazaar Region: मुंबईतील भेंडी बाजारातील तीन मजली रहिवाशी इमारतीला आग लागली. या आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजार परिसरात असलेल्या तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच परिसरात नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब आणि तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे.

मुंबईतील भेंडीबाजार हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे. याठिकाणी एकमेकांना लागूनच अनेक इमारती आहे. परिसरात नागरिकांची नेहमी वर्दळ असते. अशातच आग इतर इमारतींमध्ये पसरण्याचा धोका आहे. हीच बाब लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळच्या इतर इमारतील रहिवाशांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांचा जीव वाचवत आहेत. अशातच सोमवारी दुपारच्या सुमारास भेंडीबाजार परिसरात असलेल्या एका इमारतीला अचानक आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

अधून मधून आगीचे भडके उडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अद्याप या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT