Mumbai Water Issue: टेन्शन वाढलं! मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणी, ७ धरणांत इतकाच आहे पाणीसाठा!

How Much Water In 7 Dams: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांमध्ये अद्याप मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे या धरणातील पाणीपातळीत मोठी घट होत चालली आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणी संकट गडद होत चालले आहे.
Mumbai Water Issue: टेन्शन वाढलं! मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणी, ७ धरणांत इतकाच आहे पाणीसाठा!
Mumbai Water Supply Saam Tv
Published On

गिरीश कांबळे, मुंबई

राज्यात मान्सून (Monsoon 2024) दाखल झालाय पण अजून म्हणावा तसा पाऊस पडला नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांमध्ये देखील अद्याप मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे या धरणातील पाणीपातळीत मोठी घट होत चालली आहे. याच कारणास्तव मुंबईतील पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे आता टेन्शन जास्त वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये ५.३८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईत आधीच असलेल्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी अप्पर वैतरणा आणि भातसा धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे फक्त उर्वरीत ५ धरणांमधून सध्या मुंबईला पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातील पाण्याने देखील तळ गाठला असल्यामुळे टेन्शन वाढत चालले आहे.

Mumbai Water Issue: टेन्शन वाढलं! मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणी, ७ धरणांत इतकाच आहे पाणीसाठा!
Mumbai Water Storage: मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; भातसा तलावात फक्त २२ टक्के पाणीसाठा शिल्लक, जलसाठ्यात होतेय वेगाने घट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक?

- अप्पर वैतरणा - ० टक्के

- मोडक सागर - १५.७३ टक्के

- तानसा - २२.०५ टक्के

- मध्य वैतरणा - ९.६४ टक्के

- भातसा - ० टक्के

- विहार - १७.९२ टक्के

- तुळसी - २४.४६ टक्के

Mumbai Water Issue: टेन्शन वाढलं! मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणी, ७ धरणांत इतकाच आहे पाणीसाठा!
Mumbai News: मोठी बातमी! रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला EVM अनलॉक करणारा फोन; तपासातून खळबळजनक माहिती

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयात आज एकूण ७७,८५१ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. यामध्ये १० ते १५ टक्के पाणी कपात सध्या करण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी होत चालल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीला ५ टक्के पाणीकपात केली होती. त्यानंतर १० टक्के पाणीकपात लागू केली.

Mumbai Water Issue: टेन्शन वाढलं! मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणी, ७ धरणांत इतकाच आहे पाणीसाठा!
Mumbai News : नालासोपाऱ्यात २ मुलांचा तर संगमनेरमध्ये ३ मुलींचा बुडून मृत्यू; ३ मुलं अद्यापही बेपत्ता

सध्या मुंबईतील अनेक ठिकाणी १० ते १५ टक्के पाणी कपात सुरू आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत ही पाणीकपात लागू असणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. पाणी कपातीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीकपात लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे केले जात आहे.

Mumbai Water Issue: टेन्शन वाढलं! मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकेच पाणी, ७ धरणांत इतकाच आहे पाणीसाठा!
Mumbai Breaking: मुंबईत बटरस्कॉच आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडलं, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com