DAYA NAYAK RETIRES saamtv
मुंबई/पुणे

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

DAYA NAYAK RETIRES: मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक ३१ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेत. ९० च्या दशकात ते डॅशिंग पोलीस ऑफिसर म्हणून ओळखले जात होते.

Bharat Jadhav

  • दया नायक यांची पोलीस सेवेत ३१ वर्षांची कारकीर्द आज संपली.

  • ९०च्या दशकातील गुन्हेगारीच्या काळात त्यांनी अनेक गँगस्टरचा खात्मा केला.

  • त्यांच्या कारकिर्दीत जितकी प्रसिद्धी मिळाली, तितकीच वादग्रस्तता देखील अनुभवली.

  • सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून त्यांनी आज अधिकृत निवृत्ती घेतली.

मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच बदनामीही त्यांच्या वाट्याला आली. ९०च्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळी संपवण्यात दया नायक यांची भूमिका महत्वाची होती.

या नायक यांच्या नावावर ८६ एन्काउंटर आहेत. तर एक हजारांहून अधिक आरोपींना त्यांनी तुरुंगात पाठवले आहे. यामध्ये दाऊदच्या टोळीतील २२ गुंडांचा, राजन टोळीतील २० गुंडांचा समावेश आहे.लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE), लष्कर ए तैय्यबा यासारख्या प्रतिबंधक संघटनांशी संबंधित व्यक्तींचाही खात्मा नायक यांनी केला होता.

कंदहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवाद्यांशी संबधित तीन दहशतवाद्यांचा नायक यांनी एन्काउंटर केला होता. दहा महिन्यांपूर्वी ते एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.

Who Is Daya Nayak : कोण आहेत दया नायक?

१९९० च्या दशकात दया नायक यांना मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख मिळाली होती. त्यांनी मुंबईतील ८६ गुंडांचा एन्काउंटर केलाय. कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेले दया नायक कोकणी भाषिक कुटुंबातील आहेत.

कन्नड माध्यमाच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, १९७९ मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. येथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करत असतानाच गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Reform: आजपासून नवे दर! काय स्वस्त? काय महाग? वाचा संपूर्ण लिस्ट

पुण्यात मोठी खळबळ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन् पाच जिवंत काडतुसे, पुणे विमानतळावर गुन्हा

Weekly Horoscope: 'या' राशींचे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Bigg Boss 19 : "मैं तुमसे इश्क करने की इजाजत..."; तान्या मित्तलसाठी अमाल मलिकने गायले रोमँटिक गाणे, पाहा VIDEO

Sharadiya Navratri Celebrations: शारदीय नवरात्रोत्सवाला शुभारंभ! अंबाबाई मंदिरात पार पडली घटस्थापना|VIDEO

SCROLL FOR NEXT