Kishori Pednekar On CM Eknath Shinde, Kishori Pednekar News, Latest Marathi News, Political News Update
Kishori Pednekar On CM Eknath Shinde, Kishori Pednekar News, Latest Marathi News, Political News Update  Saam Tv
मुंबई/पुणे

आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी हार-तुरे आणून ठेवले पण...; किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलं दुःख

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज, ०६ जुलैला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबईतील (BMC) पावसाची स्थिती आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबतचा एकंदरीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत मोठं वक्तव्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री पालिकेत येणार म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी हार-तुरे आणून ठेवले, पण ते भाजपच्या कार्यालयात गेले असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे. (Kishori Pednekar latest News)

हे देखील पाहा -

किशोरी पेडणेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा पालिकेत येऊन पाहणी केली. मुख्यमंत्री पालिकेत येणार म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी हार-तुरे आणून ठेवले, पण ते भाजपच्या कार्यालयात गेले असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री भाजपच्या कार्यालयात गेले, त्यामुळे दुःख झालं. मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक म्हणतात मग त्यांना निमंत्रण देण्याची काय गरज? त्यांनी पालिकेच्या पक्ष कार्यालयात यायला हवं होतं ना असंही पेडणेकर म्हणाल्या. आम्ही २ ते २:३० वाजेपर्यंत वाट बघत होतो, नंतर आम्ही गेलो. कार्यालय बंद असलं तरी बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेतच ना... त्यांना अभिवादन केल असतं असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Live Politic News)

मुंबईच्या पावसाबाबत पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईला अलर्ट दिलेला आहे. गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाचा परिणाम आता दिसत आहे. हिंदमाता परिसरात केलेल्या टाक्यांचे चांगले परिणाम दिसत आहे. महापौर म्हणून काम केल्याने काय कमतरता आहे, हे माहीत आहे. याबाबत आदित्य ठाकरे सुद्धा आढावा घेत आहेत. पालिकेत दुसरा महापौर बसणार नाही तोपर्यंत मी काम करत राहील, ते माझं कर्तव्य आहे अंस त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे शिवसेनेला खिंडार पडली असं अजिबात नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Eknath Shinde Speech : 'धणुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT