Eknath Shinde Speech
Eknath Shinde SpeechSaam Digital

Eknath Shinde Speech : 'धनुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Eknath Shinde Speech In Kolhapur : धनुष्यबाणाच्या जागी काँग्रेसचा हाताचा पंजा आला आहे, बाळासाहेबांना काय वेदना होत असतील, याची कल्पना करायला नको, अशी बोचरी टीका कोल्हापुरातील प्रचार सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शंभर टक्के काँग्रेस झाली आहे. धनुष्यबाणाच्या जागी काँग्रेसचा हाताचा पंजा आला आहे, बाळासाहेबांना काय वेदना होत असतील, याची कल्पना करायला नको, अशी बोचरी टीका कोल्हापुरातील प्रचार सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. मोदींकडे गॅरेंटी आहे तर काँग्रेस कडे पेढ्यांचा पाऊस. धनुष्याला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असंही शिंदे म्हणाले.

पूर परिस्थितीमध्ये बाळासाहेबांना एकटे सोडून फाईव्ह स्टारमध्ये जाणारी लोकं पाहिलीत. तर कोल्हापुरात पूर आला तरी जीवाला जीव देणारी माणसं भेटली. नकली शिवसेना राहिलेली आहे हे बरोबर आहे कारण बाळासाहेब म्हणाले होते शिवसेना कधी काँग्रेस होऊ देणार नाही. आज त्यांचा मुलगा पंजाला मतदान करणार आहे, हे या देशाचं आणि राज्याचं दुर्दैव आहे. उद्धव काँग्रेससोबत गेलेले पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत, असा सवाल त्यांनी केला.

कोल्हापुरात 12 दिवस महापुरात रस्त्यावर होतो, गर्भवती महिलेची पूरातून सुटका केली. महापुरात जनावरांना जपणारे कुठे आणि 26 जुलैच्या पुरात मातोश्रीवर ठेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठं हा फरक सगळ्यांना कळतोय.

Eknath Shinde Speech
Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

इंडिया आघाडीसाठी सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचार ही धर्म आहे, एक मोदी सबको भारी है, आपण भाग्यवान आहोत की असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला भेटले आहेत. अब की बार 400 पारमध्ये कोल्हापूरचे दोन खासदार पाहिजेत, असं आवाहन त्यांनी केलं.

Eknath Shinde Speech
PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com