Elphinstone Bridge Saam tv
मुंबई/पुणे

Elphinstone Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात एलिफस्टन पूल राहणार सुरु; या दिवशी पाडला जाणार

Elphinstone Bridge News: एलफिस्टन पूल हा गणेशोत्सवाच्या कालावधीत सुरु राहणार आहे. एलफिस्टन पूल पाडण्याचे काम १० सप्टेंबरनंतर सुरु होणार आहे.

Siddhi Hande

एलफिस्टन पूलाबाबत मोठी अपडेट

एलफिस्टन पूल गणेशोत्सवानंतर पाडण्यात येणार

१० सप्टेंबरपासून पाडकामाची प्रक्रिया सुरु होणार

गणेशोत्सावाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात भक्त गणपती बाप्पााच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या एलफिस्टन पूलाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता हा पूल गणेशोत्सवापर्यंत सुरु राहणार आहे.एलफिस्टन पूल हा गणेशोत्सवानंतर पाडण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एलफिस्टन पूल सुरु ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर १० सप्टेंबरपासून हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. यानंतर पूल पाडण्याची प्रक्रिया सुरु होईल. हा पूल प्रभादेवी परिसरात आहे. हा ब्रिटिशकालीन पूल असून १२५ वर्षे जूना आहे. या पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव काळात प्रभादेवी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात हा पूल सुरु ठेवला जाणार आहे. अनंत चतुर्दर्शीनंतर १० सप्टेंबर रोजी हा पूल पाडण्यात येईल. या ठिकाणी डबलडेकर पूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टरसाठी आवश्यक रचना उभी करण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. वाहतूक विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे.

एलफिस्टन पूल पाडण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी विरोध केला आहे. पाडकामासोबतच काही इमारतीदेखील जमीनदोस्त होणार आहे. त्यामुळे त्या इमारतीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

एलफिस्टन पूल हा मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांना जोडतो. तसेच परळ आणि प्रभादेवी पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्गत आहे. या पूलावरुन परळहून दादर, लोअर परेल तसेच प्रभादेवीवरुन लालबाग, शिवडी, परळ या परिसरातील वाहतूक केली जायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT