Mumbai Drugs Case: बेल की जेल? आर्यन खान किला कोर्टात सुरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai Drugs Case: बेल की जेल? आर्यन खान किला कोर्टात

आज आर्यन खानची कोर्टात सुनावणी होणार आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: मुंबईहून गोव्याकडे Mumbai To Goa जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये Cruz Drugs Party ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा Aryan Khan मुलगा आर्यनचे नावही पार्टीमध्ये समोर आले आहे. त्याची एनसीबी टीमकडून चौकशी केली जात आहे. तर या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूझवर आज पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे NCB चे पथक तपासणीसाठी आज सोमवारी सकाळी पोहचले. यावेळी आणखी 8 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर आज आर्यन खानची कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळं आर्यन खानला जमीन मिळणार की नाही हे थोड्याच वेळात समजणार आहे.

मुंबईच्या किनाऱ्याजवळ कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी Rave Party सुरु होती. त्यावेळेस शनिवारी NCB ने छापा टाकला आणि या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा Shshrukh Khan मुलगा आर्यन खान सुद्धा क्रूझवर होता. त्याला एनसीबी कडून अटक करण्यात आली आहे.

आज आर्यन खानला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल एकदिवसासाठी आर्यनची कस्टडी Custody मिळाली होती. एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. या आठही जणांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं आहे.

ज्या पाच जणांना काल एनसीबीने ताब्यात घेतलं होतं त्यांनाआज जेजे मध्ये मेडिकल करून पून्हा एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं आहे. या पाच जणांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. तर सध्या आर्यन खान बद्दल मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आर्यन खानला किला कोर्टात आणण्यात आल आहे. आर्यन खान सह सर्व आरोपी कोर्टात हजार झाले आहेत. थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT