Pandora Papers: मास्टर ब्लास्टर, अंबानींसह सेलिब्रिटींच्या परदेशातील मालमत्तेचा खुलासा!

जगात काही सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोक आहेत. परंतु त्यांची संपत्ती ही दिसते तेवढी नसते!
Pandora Papers: मास्टर ब्लास्टर, अंबानींसह सेलिब्रिटींच्या परदेशातील मालमत्तेचा खुलासा!
Pandora Papers: मास्टर ब्लास्टर, अंबानींसह सेलिब्रिटींच्या परदेशातील मालमत्तेचा खुलासा!Saam Tv
Published On

पेंडोरा पेपर्स: जगात काही सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोक आहेत. परंतु त्यांची संपत्तीही दिसते तेवढी नसते! ही मालमत्ता किती आहे हे त्यांना आणि काही लोकांना वगळता कोणालाही माहिती नाही. पण जेव्हा त्याच्या संपत्तीचा खुलासा होतो तेव्हा अख्या जगाच्या भुवया उंचावतात. असाच एक गुप्त सौदा आणि लपवलेल्या मालमत्तेचा एक खुलासा पेंडोरा पेपर्समध्ये झाला आहे. जो श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांशी संबंधित मोठा खुलासा आहे.

पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर (Panama Paper) लीकनं जगभरातील अनेकांना मोठा धक्का दिला होता. या पेपर लीकमधून अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि कर चोरीची प्रकरणे समोर आली होती.

परंतु आता पुन्हाएकदा ICIJ नं (The International Consortium of Investigative Journalists) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि उद्योजक अनिल अंबानी यांच्या नावाचाही समावेश आहे.

जगभरातील 11.9 कोटी दस्तऐवजांची माहिती शोधल्यानंतर हे आर्थिक रहस्य जगासमोर आणलं आहे. ICJI नं दिलेल्या माहितीनुसार पँडोरा पेपरच्या तपासात 117 देशांतील 600 रिपोर्टर्सचा समावेश होता. वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर हे प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यात जगातील 35 राजकारण्यांची नावे नमूद आहेत, ज्यात सध्याचे सत्ताधारी आणि माजी सत्ताधारी नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय उद्योगपती आणि इतर अनेक सेलिब्रिटींची नावेही या यादीत आहेत. तथापि, ज्यांची नावे पेंडोरा पेपर्समध्ये आहेत त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या आहेत असेही नाही. देशातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने पेंडोरा पेपर्सशी संबंधित खुलासे तपशीलवार प्रकाशित केले आहेत. पेंडोरा पेपर्समधील नोंदी उघड करत आहेत की, रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि त्यांचे प्रतिनिधी जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि सायप्रसमध्ये कमीतकमी 18 offshore company चे मालक आहेत.

Pandora Papers: मास्टर ब्लास्टर, अंबानींसह सेलिब्रिटींच्या परदेशातील मालमत्तेचा खुलासा!
Lakhimpur kheri Violence: प्रियांका गांधींना सोडलं नाही तर...

सचिन तेंडुलकर चे नाव का ?

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे नावही पेंडोरा पेपर्समध्ये आले आहे. सचिन तेंडुलकर हे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि त्यांचे नाव क्रीडा विश्वात घेतले जाते. सध्या सचिन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाशी संबंधित आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सचिनसोबत त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, सासरे आनंद मेहता यांचीही नावे या पत्रांमध्ये आहेत. पंजाब नॅशनल बँकेत PNB हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीच्या Nirav Modi बहीणीनं त्याच्या पलायनाच्या एका महिन्यापूर्वी एक ट्रस्ट तयार केला होता. तसंच पनामा पेपर्स लीकनंतर अनेक भारतीयांनी आपली संपत्ती रिऑर्गनाईज करण्यास सुरूवात केली होती असे या केल्याचं अहवालात नमूद केलं होतं. त्याचप्रकारे या अहवालानुसार दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील लीकच्या तीन महिन्यानंतर ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील आपली संपत्ती विकण्याचे प्रयत्न केले होते, अशी वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात येत आहे.

तसेच यात अनिल अंबानी, किरण मजुमदार शॉ यांचे पती, नीरव मोदी यांची देखील नाव असलयाचे सांगितले आहे. वृत्तसंस्थेनुसार, 300 भारतीयांची नावे पेंडोरा पेपर्समध्ये नोंदणीकृत आहेत. किमान 60 प्रमुख व्यक्ती आणि कंपन्यांच्या ऑफशोअर होल्डिंगची चौकशी करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी नावे उघड होण्याची शक्यता आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com