Lakhimpur kheri Violence: प्रियांका गांधींना सोडलं नाही तर...

''उत्तर प्रदेशातील लाखीमपूर खेरीमध्ये भाजपने हिंसाचार केला आहे.
Lakhimpur kheri Violence: प्रियांका गांधींना सोडलं नाही तर...
Lakhimpur kheri Violence: प्रियांका गांधींना सोडलं नाही तर...Saam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : ''उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh लाखीमपूर खेरीमध्ये भाजपने हिंसाचार lekhimpur kheri केला आहे. त्याठिकाणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी priyanka gandhi शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police रोखून धरलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय तालिबानचे सरकार आहे का? प्रियांका गांधींनी सोडलं नाही तर आम्ही महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करू'', अशा साफ इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी आज दिला आहे.

हे देखील पहा-

पुढे ते म्हणले, भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. तीन काळे कायदे केंद्राने आणले. शेतकरी विरोधी धोरण भाजपचे मूळ आहे. गाडीखाली शेतकऱ्यांना कुचलले आहे. गृहमंत्र्यांच्या पोराने हे केलं. आणि ठरवून केलं आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात आज प्रत्येक जिल्ह्यात कोंग्रेस आंदोलन करणार. मात्र, शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्यांविरोधात कारवाई झाली नाहीतर, आम्ही हे थांबला नाही तर महाराष्ट्रबंदची हाक पण देऊ. तसेच यूपी सरकार बरखास्त करा आणि मोदींचं सरकार Modi Government बरखास्त करण्याची मागणी करू.

Lakhimpur kheri Violence: प्रियांका गांधींना सोडलं नाही तर...
राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार; 'अशी' घेतली जाणार काळजी

राज्यात शेतकऱ्यांवर संकट केंद्राने मदत करावी. शेतकरी भारताचा कणा आहे. भाजप खोटारडा पक्ष आहे. भाजपचं धोरण शेतकरीविरोधी आहे. तालिबानी वृत्ती भारतात भाजप निर्माण करत त्याचे रूप आहे. भाजप हा खोटारडा पक्ष आहे. खोट बोलायचं पण रेटून बोलायचं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करा, हे भाजपचं धोरण आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com