राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार; 'अशी' घेतली जाणार काळजी

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर राज्यभरातील काही ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू करण्यात येत आहेत.
राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार; 'अशी' घेतली जाणार काळजी
राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार; 'अशी' घेतली जाणार काळजीSaam Tv
Published On

School Reopening: कोरोनाची लाट काही प्रमाणात कमी झाल्यानंतर अखेर शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर राज्यभरातील काही ग्रामीण भागात Rural Area पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू करण्यात येत आहेत. विविध जिल्ह्यांमधील शाळांनी यासंदर्भात तयारी केली आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी येण्याची वाट पाहिली जात आहे. करोना आणि लॉकडाऊन नंतर पुन्हा मित्रपरिवार, शिक्षक, भेटणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्सुकता आणि आनंदाचे वाटपासून दिसून येत आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार शाळांमध्ये स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे. तर विद्यार्थ्यंना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील पहा-

तर विद्यार्थी शाळेत येण्यापुर्वी शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण Corona Vaccination पूर्ण झालेले पाहिजे. अशी काळजी शाळांकडून घेण्यात येणार आहे. तसेच वर्गात एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही. मैदानी खेळ किंवा तत्सम कारणांनी विद्यार्थी एकमेकांच्या जवळच्या संपर्कात येणार नाहीत.

शाळा सुरु होणार आहेत तरीही, पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकणार आहेत. राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु होत आहेत. यानिमित्ताने विद्यार्थी आणि पालकांना मनापासून शुभेच्छा! आजचा शाळेतील पहिला दिवस आपण सुरक्षित आणि आनंदीत वातावरणात घालवाल, असा मला ठाम विश्वास आहे. असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

शाळांसाठी महत्वाचे निर्देश
आजपासून राज्यभरातील शाळा सुरु होत आहेत तरीही, टास्क फोर्सने Task Force दिलेल्या सुचनांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. प्रत्येक शाळेने शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक Health Clinic सुरु करावे. नियमितपण विद्यार्थ्यांचे शरीराचे तापमान तपासावे. अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थी हे स्कूलबस किंवा खासगी वाहनांनी येतात तिथे एका सीटवर एक विद्यार्थी बसवले जाणार, अशी आसन व्यवस्था असावी असे निर्देश आहेत. जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुवावेत अश्या सूचना विद्यार्थ्यांना सतत द्याव्यात. तसेच सद्यस्थितीत मैदानी खेळ घेऊ नयेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com