mumbai dharavi news
mumbai dharavi news  Saam tv
मुंबई/पुणे

Dharavi Girl News: मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीतील मुलीचं नशीब उजळलं; मलिशा बनली आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडचा चेहरा

Vishal Gangurde

Mumbai Dharavi News: मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीचं नशीब पालटलं आहे. या मुलीची लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. मलिशा खारवा असे १४ वर्षीय मुलीचे नाव आहे. (Latest Marathi News)

हॉलीवूडमधील अभिनेते रॉबर्ट हॉफमॅन यांनी २०२० साली मालिशाला शोधलं. रॉबर्ट हा एका गाण्याच्या शुटिंगसाठी मुंबईत आला होता. यावेळी त्याने मलिशाचं इन्स्टाग्रामचं खात देखील उघडून दिलं होतं. मलिशाचे इन्स्टाग्रामवर २ लाख २५ हजार फॉलोवर्स आहेत.

धारावीत राहणारी मलिशा मॉडेलिंग देखील केली आहे. मलिशाने 'लिव योर फेयरीटेल' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे. मलिशाचं लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

फॉरेस्ट इसेंशियल्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, 'मलिशा ही फॉरेस्ट इसेंशियल्सच्या स्टोरमध्ये स्टोर करत आहे. या स्टोरमध्ये तिचे फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे.

या व्हिडिओ चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लिहिलं आहे की, यश डोळ्याने पाहणं खूप शानदार वाटतंय. तिला आशीर्वाद आणि तिचं भविष्य आणखी उज्वल होवो'.

फॉरेस्ट इसेंशियल्सचे संस्थापक मीरा कुलकर्णी याचं म्हणणं आहे की, 'आम्ही केवळ मलिशालाच्या स्वप्नांना प्रोत्साहान देत नसून युवकांच्या पिढीच्या वैचारिकतेला सशक्त बनवण्यासाठी हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. हा ब्रँड मिळालेल्या उत्पन्नातून १० टक्के या प्रकल्पासाठी दान करणार आहोत. वंचित मुलांच्या शिक्षणासाठी एकप्रकारे नियोजन करत आहोत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

SCROLL FOR NEXT