Mumbai Dam Water level Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Dams Water Level : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत किती पाणीसाठा? ७ तलावांतील आकडेवारी आली समोर

Mumbai Dams News : मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा येथून पाणी पुरवठा केला जातो.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्यात ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने नागरिकांची चिंता वाढला आहे. अनेक धरणांमधील पाणीसाठाही मागील वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे.

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमधील पाणीसाठी 90.37 टक्क्यांवर आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 90.37 टक्के इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी पातळी कमीच आहे.  (Latest Marathi News)

मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा येथून पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, तानसा येथील पाण्याची पातळी 97.47 टक्के आहे.

मोडक सागरमध्ये 91.80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्य वैतरणा 96.29 टक्के, अप्पर वैतरणा 78.83 टक्के, भातसा 90.25 टक्के, विहार 100 टक्के आणि तुळशीमध्ये 99.05 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, गुरुवारी मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. IMD ने मुंबईसाठी गुरुवारी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काही वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Tesla Y Model Specification: टेस्लाचे सुपर फिचर्स आता भारतात, खास फिचर्स जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT