Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचं कमबॅक, अनेक जिल्ह्यांमध्ये बरसल्या सरी; आज कुठे कोसळणार पाऊस?

Maharashtra Rain Updates: हवामान खात्याने वर्तवला अंदाज तंतोतंत खरा ठरला, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बुधवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
Maharashtra Rain Updates In Marathi
Maharashtra Rain Updates In MarathiSaam TV

Maharashtra Rain Updates: हवामान खात्याने वर्तवला अंदाज तंतोतंत खरा ठरला, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बुधवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Rain Updates In Marathi
Astrology Today: कृष्ण जन्माष्टमीला जुळून आला अनोखा योग; या राशींच्या सर्व अडचणी संपणार

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात

बुधवारी राज्यातील परभणी, अमरावती, नंदुरबार, वाशिम, आणि भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. नंदुरबारमधील नवापूर शह आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एका शेतकरी कुटुंबाने चक्क ढोल ताशांच्या तालावर नाचत आनंद साजरा केला.

परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी

परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

अमरावतीत जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी

बुधवारी अमरावती जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शहरात वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळं वाहन चालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. जवळपास एक महिन्याच्या खंडानंतर बरसलेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain Updates In Marathi
Maratha Reservation: ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी (Rain News) लावली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला

विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून प्रखर ऊन्ह असताना दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे खरीपातील पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून आजही विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com