Mumbai Dam Water Level Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं किती टक्के भरली? वाचा लेटेस्ट अपडेट

Mumbai Dam Water Level Latest Update: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली आहे. या सातही धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Priya More

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा जमा झाला हे आपण पाहणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९७ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,०५,६७९ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९७.१२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १३,१२,६७३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ९०.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा ७ टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या दोन महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो. आता या सातही धरणांमध्ये आता ९७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९७.४८ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ९८.९९ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९८.३७ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९८.६६ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९५.८७ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Mobile Recharge : 400 रुपयांमध्ये 400GB डेटा, धमाकेदार ऑफर

Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT