mumbai lake  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level (26 Jul): गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारा तिसरा तलाव 'ओव्हरप्लो'; कोणत्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

Mumbai Dam Water Level Today: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणारा तिसरा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai Dam Water News Today:

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणारा तिसरा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईकरांची पाणीचिंता दूर होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी रात्री उशिरा १२.४८ मिनिटांनी विहार तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तिसरा तलाव ओसंडून वाहू लागला असला आहे. तरी शहरात सध्या १० टक्के पाणीकपात कायम आहे. त्यामुळे मुंबईकर पाणीकपात केव्हा रद्द होणार, याच्या प्रतीक्षेत आहे. (Mumbai Latest News)

दरम्यान, मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लीटर एवढी आहे. सध्या एकूण सर्व धरणात ५८.९३ टक्के अर्थात ८ लाख ५२ हजार ९५७ दशलक्ष लीटर एवढा पाणीसाठा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळसी तलाव, तानसा तलाव आणि विहार तलाव असे तिन्ही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. आता मोडक सागर तलाव केव्हा भरणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मोडक सागर तलाव सध्या ८७.६९ टक्के एवढा भरला आहे.

दरम्यान, विहार तलाव (Lake भरल्यानंतर या तलावाचं पाणी मिठी नदीत येतं. त्यामुळे मिठी नदीची पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे मिठी नदी असलेल्या कुर्ला आणि इतर भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. (Mumbai Dam Water Level)

तानसा धरणाचे ४ दरवाजे उघडले

मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणांपैकी एक तानसा धरण हे बुधवारी रात्रीच्या सुमारास भरले आहेत. तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून ४४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT