Mumbai Water Shortage Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Shortage: मुंबईकरांची चिंता वाढली; सातही धरणांमध्ये आता इतकाच पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Mumbai Dam Water Level Decreasing: मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मागील काही दिवस समाधानकारक पाऊस न पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा सुरु झाला असला तरीही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने पाणीकपात करावी लागली आहे. नवी मुंबईमध्ये तर आठवड्यातून ३ दिवस सायंकाळी पाणीकपात करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईतील धरणक्षेत्रात अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सातही धरणात एकूण ५.३१ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल. गुरुवारी पहाटेपर्यंत धरणक्षेत्रात फक्त १६२ मीमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठी कमी असल्याने महानगरपालिककेने ५ जूनपासून पाणीकपात लागू केली आहे. धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नाही आणि नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटेल एवढा पाणीसाठा तयार होत नाही तोपर्यंत पाणीकपात कायम ठेवण्यात येईल.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत ऊर्ध्व वैतरणामध्ये १० मीमी पाऊस तर मोडकसागरमध्ये २३ मीमी पाऊस, तानसामध्ये ३८ मीमी, वैतरणामध्ये १८ मीमी, भातसामध्ये १० मीमी, विहारमध्ये १५ मीमी, तुळशीमध्ये ४९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी या धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे मागील वर्षी पाणीटंचाईची समस्या तुलनेने कमी होते. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यानेच नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटेल, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE 10th Result 2026 Declared : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या माहिती

Solkadhi Benefits: उन्हाळ्यात थंडगार सोलकढी पिण्याचे हे आहेत 5 आश्चर्यकारक फायदे

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, वाचा आजचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: IT कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरण; अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Horoscope: पुढील १५ दिवसात नशीब पालटणार! जीवनात असतील रिस्क आणि ट्विस्ट, कोणत्या राशी ठरतील भाग्यवान अन् कोणाला होईल नुकसान?

SCROLL FOR NEXT