Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार? देवेंद्र फडणवीसांनी नाव सूचवल्याची माहिती, Exclusive VIDEO

Pankaja Munde Rajya Sabha News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठवलं जाणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde NewsSaam tv
Published On

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठवलं जाणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. तसा प्रस्ताव देखील महाराष्ट्र भाजपने केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी ६ हजारांहून अधिक मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील त्यांच्या पराभवामुळे निराश झाले. काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचललं. पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आता नवी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे मराठा समाज हा आगामी निवडणुकीत भाजपपासून दूर जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता भाजपकडून ओबीसी नेत्यांना जवळ घेतलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Pankaja Munde
Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल आज तुरुंगातून बाहेर येणार? आम आदमी पक्षाकडून जल्लोषाची तयारी सुरू

पंकजा मुंडे या ओबीसीच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर संधी दिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केली आहे.

यापूर्वी देखील दोनवेळा पंकजा मुंडे यांचं नाव विधानपरिषदेवर नेमण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपने पाठवला होता. आता त्यांचं नाव थेट राज्यसभेवर पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यसभेची खासदारकी देऊन पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलं जाईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Pankaja Munde
VIDEO: भाजपचा हस्तक्षेप, शिंदे गटाचा आक्षेप?, स्ट्राईक रेट वाढला, सगळा हिशोब काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com