मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये पाणी साठा वाढला
सातही धरणांमध्ये ७७.६२ टक्के पाणीसाठा जमा झाला
मोडक सागर, विहार आणि तुळशी तलाव पूर्ण क्षमतेने भरले
तानसा धरणात ९८.७७ टक्के, भातसा धरणात ७३.५१ टक्के पाणीसाठा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या तुफान पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. सातपैकी ४ धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. तर इतर धरणांमधील पाणीसाठा देखील वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणीपुरवठ्या बाबतची चिंता मिटली आहे.
गेल्या काही तासांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठी वाढला आहे. या सातही धरणांममध्ये ७७.६२ टक्के पाणीसाठा आहे. मोडक सागर, तुलसी आणि विहार ही ३ धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर उर्वरीत धरणांमधील पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. या धरणांमधील पाणीसाठा वाढल्यामुळे मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आजही हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जर धरण क्षेत्रात आणखी चांगला पाऊस झाला तर पाणीसाठा आणखी वाढेल.
मुंबई शहर आणि उपनगराला ५ धरण आणि २ तलावामधून पाणी पुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा ही पाच धरणं आहेत. तर विहार आणि तुळशी हे दोन तलाव आहेत. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होत गेली. या धरणातील पाणीसाठा आता ७७ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा आणखी वाढेल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरववठा केला जातो.
भातसा धरण - ७३.५१ टक्के
उप्पर वैतरणा धरण- ६२.९७ टक्के
मध्य वैतरणा धरण- ७५.१४ टक्के
मोडक सागर धरण - १०० टक्के
तानसा धरण - ९८.७७ टक्के
विहार तलाव - १०० टक्के
तुलसी तलाव - १०० टक्के
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.