Mumbai Online Fraud Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Online Fraud: बापरे! २५ समोस्यांची किंमत दीड लाख रुपये... मुंबईतल्या डॉक्टरला धक्का; एका झटक्यात बँक खातं रिकामं

Mumbai Sion Cyber Crime: ऑनलाईन जेवण मागवताय; आधी हे वाचा... |मुंबईतल्या एका डॉक्टरला २५ प्लेट समोस्यांसाठी १ लाख ४० हजार रुपये मोजावे लागले आहेत.

Gangappa Pujari

Sion Cyber Crime With Doctor: सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरबसल्या अनेक वस्तू ऑनलाईन ऑर्डर करत असतो. मात्र ऑनलाईन ऑर्डर करताना थोडासा निष्काळजीपणा चांगलाच महागात पडू शकतो. असेच एक धक्कादायक प्रकरण मुंबईमधून समोर आले आहे. मुंबईतल्या एका डॉक्टरला २५ प्लेट समोस्यांसाठी १ लाख ४० हजार रुपये मोजावे लागले आहेत. काय आहे प्रकरण; चला जाणून घेवू...

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सायनमधून हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. झालं असं की; केईएम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय डॉक्टरने आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी ऑनलाइन 25 समोसे ऑर्डर केले होते. त्यासाठी त्याला 1500 रुपये देण्यास सांगण्यात आले.

डॉक्टरांनी सांगितलेल्या नंबरवर 1500 रुपये पाठवले. मात्र डॉक्टरांनी पाठवलेले हे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे पुन्हा पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले. सायबर चोरट्यांनी डॉक्टरला पुन्हा पैसे भरण्याची विनंती आली. त्यांच्या सांगण्यानुसार डॉक्टरानेह पैसे दिले. ही पेमेंट रिक्वेस्ट लिंक ओपन केल्यानंतर डॉक्टरांच्या खात्यातून थेट २८ हजार रुपये कट झाले.

२५ समोस्यांची किंमत दीड लाख रुपये....

हे पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. कारण त्यांना फक्त 1500 रुपये भरायचे होते, मात्र त्यांना काही समजण्याआधीच त्यांच्या खात्यातून पेमेंट कट झाल्याचा संदेश अनेकवेळा आला आणि त्यांच्या खात्यातून एक लाख 40 हजार रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तातडीने आपले खाते बंद करून पोलिसांत तक्रार दाखल केली.

डॉक्टरांच्या थोड्या निष्काळजीपणामुळे चोरट्यांनी हुशारीने त्यांच्या खात्यातून सुमारे दीड लाख रुपये काढून घेतले. 25 समोस्यांसाठी केवळ 1500 रुपये द्यायचे होते, मात्र सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकून त्यांचे दीड लाख रुपये गमवावे लागले. या फसवणुकीबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

Investment Tips: फक्त १००० रूपयांची गुंतवणूक करा अन् लखपती व्हा, कसं ते जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT