Mumbai Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Railway News : गुड न्यूज! रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी जलद होणार; पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेबाबत महत्वाची अपडेट समोर

Mumbai Local News : सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या कामांना वेग आला आहे. १६ वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, मुंबईतील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • सीएसएमटी–कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गिकांच्या कामांना वेग

  • १६ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प आता मार्गी

  • कुर्ला ते परळ टप्प्यात काम जोरात सुरू

  • पूर्ण झाल्यावर प्रवाशांची गर्दी कमी होणार

  • अधिक लोकल गाड्या चालवणे शक्य होणार

मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी सीएसएमटी – कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामांना अखेर वेग आला असून, प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जोरात सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत होता. मात्र आता या कामात गती आल्याने लवकरच प्रवाशांना अधिक लोकल गाड्यांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली. विशेषतः भूसंपादन, रहिवाशांचे पुनर्वसन, निधीची उपलब्धता आणि विविध प्रशासकीय मंजुरी यामुळे हा प्रकल्प तब्बल १६ वर्षे रखडला होता. मात्र आता संबंधित यंत्रणांनी या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर केल्या आहेत. अनेक नागरिकांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले असून, प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या कुर्ला ते परळ या टप्प्यातील कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गिकेची एकूण लांबी सुमारे १०.१० किलोमीटर असून, येथे ट्रॅक टाकण्यापासून ते इतर पायाभूत सुविधांची उभारणी वेगात सुरू आहे. परळ रेल्वे स्थानक परिसरातही मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, प्लॅटफॉर्म विस्तार, सिग्नल यंत्रणा आणि पूल बांधणी यांसारख्या कामांचा समावेश आहे.

या प्रकल्पाचा दुसरा टप्पा परळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान सुमारे ७.४० किलोमीटर लांबीचा आहे. हा टप्पाही लवकरच गती घेणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर अतिरिक्त लोकल गाड्या चालवणे शक्य होणार आहे.

दरम्यान, या नव्या मार्गिकांमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच गर्दीतही मोठी घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेवरील दैनंदिन लाखो प्रवाशांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

SCROLL FOR NEXT