Mumbai Goregaon Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : महिलांची छेड काढणाऱ्या 'सिरीयल मोलेस्टर'ला बेड्या, असा अडकला मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Goregaon Crime News : मुंबईतील गोरेगाव परिसरात महिलांना लक्ष्य करणाऱ्या सिरीयल मोलेस्टरला बांगूर नगर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील सिरीयल मोलेस्टर ४८ तासांत अटकेत

  • बांगूर नगर पोलिसांची जलद आणि प्रभावी कारवाई

  • २९ CCTV फुटेज तपासून आरोपीचा शोध

  • महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील महिलांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या सिरीयल मोलेस्टरला बांगूर नगर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करून मोठे यश मिळवले आहे. रस्त्यावर एकट्या जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्याशी अश्लील प्रकार करणाऱ्या या आरोपीमुळे गोरेगाव पश्चिम परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजता गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर परिसरात एक तरुणी पायी घरी जात होती. त्यावेळी आरोपीने चुकीच्या बाजूने येत अचानक तिच्याशी छेडछाड केली आणि तिच्या शरीराला अश्लील पद्धतीने स्पर्श करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेने बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल २९ CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या विशेष पथकाच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात यश आले. तपासादरम्यान पोलिसांनी मुन्नवर नासिर खान (वय २५) याला अटक केली. तो आरे कॉलनी परिसरात राहत असून फिल्मसिटीमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तपासात तो यापूर्वीही अशाच प्रकारच्या चार छेडछाडीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

आरोपीविरुद्ध महिलेशी छेडछाड आणि अश्लील कृत्यांबाबत भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून सध्या आरोपीची अधिक चौकशी सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बांगूर नगर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी सतर्कता वाढवली असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Afghanistan ODI: रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

Maharashtra News Live Update : पुण्यात एल निनोचा मॉन्सूनवर प्रभाव, सरासरी पेक्षा ९० टक्के इतकाच पाऊस पडेल

दरमहा 2250 रुपये मिळणार! 'या' सरकारी योजनेसाठी कोण पात्र? जाणून घ्या

Mumbai water crisis : मुंबईकरांची चिंता वाढली! वैतरणा धरण कोरडे, ७ धरणांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक

वायुसेनेचे विमान क्रॅश! लँडिंगनंतर विमानाला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT