Photographer Attacked on Tourist at Juhu Beach Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईतल्या जुहू चौपाटीवर रक्तरंजित थरार, फोटोग्राफरकडून पर्यटकावर जीवघेणा हल्ला; पाहा थरारक VIDEO

Photographer Attacked on Tourist at Juhu Beach: मुंबईतल्या जुहू चौपाटीवर पर्यटकावर जीवघेणा हल्ला केला. फोटोग्राफरने हा हल्ला केला असून यामध्ये पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • मुंबईतल्या जुहू चौपाटीवर पर्यटकावर जीवघेणा हल्ला

  • अनधिकृत फोटोग्राफरकडून पर्यटकाला रक्त येईपर्यंत मारहाण

  • हाणामारीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

  • सांताक्रूझ पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

मुंबईतल्या जुहू चौपटीवर पर्यटकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोटोग्राफरने जुहू चौपटीवर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकावर हा हल्ला केला. या हल्ल्यात पर्यटक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या फोटोग्राफरविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफरने पर्यटकावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. फोटोग्राफर आणि पर्यटकांचा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत सांताक्रुझ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या फोटोग्राफरचा शोध सुरू केला आहे. या फोटोग्राफरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही घटना घडली त्यावेळी जुहू चौपाटीवर उपस्थित असलेल्या पर्यटकांमध्ये खळबळ उडाली होती.

मुंबईच्या जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी मोठ्या संख्येने देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून पर्यटक येत असतात. या चौपाटीवर असलेले अनधिकृत फोटोग्राफर पर्यटकांचे फोटो काढतात. यावेळी काही फोटोग्राफरकडून पर्यटकांसोबत दादागिरी आणि हाणामारी करण्याच्या घटना देखील घडतात. त्यामुळे जुहू चौपाटीवर दादागिरी करणारे फोटोग्राफर विरोधात कारवाई करण्याची पर्यटकांकडून मागणी केली जात आहे. दुसरी बाजू या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जुहू चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

यमुना नदीत कालिया नाग पुन्हा दिसला? महाकाय कालिया नागांमुळे दहशत?

मुंबईत उद्धव ठाकरेंचे नगरसेवक अ‍ॅक्शन मोडवर; महत्वाचा मुद्दा हाती घेतला

शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव! ६१ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT