Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईत बिल्डरवर धाडधाड गोळ्या झाडल्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Builder Attack Video: चारकोपमध्ये बिल्डरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. गोळीबारामध्ये जखमी झालेल्या बिल्डरवर उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • चारकोपमध्ये बिल्डर फ्रेडी दिलीमा यांच्यावर गोळीबार

  • हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

  • बिल्डर गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू

  • हल्लेखोर फरार असून चारकोप पोलिस शोध घेत आहेत

संजय गडदे, मुंबई

मुंबईतल्या चारकोपमध्ये बिल्डरवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गोळीबाराचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या गोळीबारामध्ये बिल्डर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिल्डरच्या पोटात गोळ्या घुसल्या होत्या सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास सध्या चारकोप पोलिस करत आहेत.

चारकोपमध्ये बिल्डरवर झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ समोर आला आहे. चारकोपमध्ये बिल्डर फ्रेडी दिलीमा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. फ्रेडी आपल्या मित्रासोबत जात होते. त्याचवेळी चारकोपच्या बंदर पाखाडी परिसरातील पेट्रोल पंपाच्या बाहेर ही घटना घडली होती. एका अज्ञात व्यक्तीने फ्रेडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या होत्या. आरोपीने फ्रेडी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केले होते.

समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फ्रेडी आणि त्यांचा मित्र एका गेटमधून बाहेर पडून कारच्या दिशेने जात आहेत. फ्रेंडी कारचा दरवाजा उघडायला जाणार तोवर त्याठिकाणी उभा राहिलेला एक तरुण त्यांच्यावर गोळ्या झाडतो. फ्रेडींच्या छातीत आणि पोटात आरोपी दोन गोळ्या झाडतो आणि पळून जातो. जखमी झालेले फ्रेडी रस्त्यावर लोळताना दिसत आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. फ्रेडी यांच्यावर हल्ला नेमका का करण्यात आला? यामागचे कारण समोर आले नाही.

फ्रेडी यांच्या मित्राने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. फ्रेडी यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पोटातून गोळ्या काढण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपास सुरू केला. तर फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली-मिरजेला गारपिटीचा तडाखा; मुसळधार पावसाने शहर ठप्प

Weight Loss Recipe : वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी अन् चटपटीत पदार्थ, वजन झटपट होईल कमी

Maharashtra News Live Update: राळेगांवमध्ये भाजपचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

Chanakya Niti: पुरुषांच्या या 6 सवयी करिअर करतात उद्धवस्त, आत्ताच व्हा सावध अन्यथा...

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

SCROLL FOR NEXT