Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: सिगारेट द्यायला नकार, तरुणाने पान टपरीवाल्याला जिवंत जाळलं; मुंबई हादरली

Pan Shop Owner Set on Fire: जोगेश्वरीमध्ये पान टपरीवाल्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. सिगारेट देण्यास नकार दिल्यामुळे एका तरुणाने हे भयंकर कृत्य केले. पोलिसांनी त्याला अटक केली.

Priya More

Summary -

  • सिगारेट दिली नाही म्हणून तरुणाला राग अनावर

  • पान टपरी मालकावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

  • सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली

  • आरोपीला पोलिसांनी अटक केली

मुंबईमध्ये सिगारेट दिली नाही यावरून झालेल्या वादात एका तरुणाने पान टपरीवाल्याला जिवंत जाळले. या घटनेत पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनंतर, १० जानेवारी रोजी जोगेश्वरी पश्चिमेतील यादवनगरमध्ये ही घटना घडली. ३५ रूपयांच्या थकबाकीमुळे पान टपरीवाल्याने मित्राला सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या पान टपरीच्या मालकाला तरुणाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पान टपरीचा मालक जखमी झाला. स्थानिकांनी तात्काळ मदत करत आग विझवली आणि त्यांना उपचारासाठी जोगेश्वरीच्या मल्लिका रुग्णालयात दाखल केले. राजेंद्र यादव असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्यांच्या पाठिला गंभीर दुखापत झाली आहे.

ही संपूर्ण घटना पान टपरीच्या जवळ असलेल्या दुकानावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र हे जोगेश्वरी पश्चिमेकडील बांदिवली हिल रोडवरील फेकू पहेलवान चाळीमध्ये राहतो. तर आरोपी नागेंद्र हा त्याच परिसरात राहतो. त्याची पानाची टपरी असून ती त्याचा पुतण्या चालवतो. आरोपी हा राजेंद्र यांचा पुतण्याचा मित्रच आहे. तो नेहमी या पान टपरीवर येऊन सिगारेटचे सेवन करायचा.

१० जानेवारीच्या रात्री साडेदहा वाजता आरोपीने पान टपरीवर जाण्यापूर्वी एका मित्रासोबत दारू प्यायली होती. पान टपरीवर आल्यानंतर त्याने सिगारेट मागितली. पण मागिल थकबाकी असल्यामुळे टपरीवाल्याने त्याला सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पान टपरी मालकाने हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीला घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितले.

त्यानंतर २० मिनिटांनी आरोपी पान टपरीवर आला. त्याने सोबत पेट्रोल आणि माचिस आणले होते. त्याने पान टपरीवाल्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने पान टपरी मालकावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी पान टपरी मालकाला वेळीच रुग्णालयात दाखल केले त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, तिकीटाबाबत रेल्वेने घेतला मोठा निर्णय; यापुढे...

Akola : ...तर राजीनामा देणार, आमदार नितीन देशमुखांनी भाजपवर आरोप करत केलं मोठं वक्तव्य

Bigg Boss Marathi : "मी पण लायकी काढू शकते..."; राधा पाटील दिपाली सय्यदवर भडकली, 'लावणी'वरून राडा-VIDEO

Maharashtra Infrastructure: समृद्धी महामार्गाला आणखी एक एक्सप्रेसवे जोडणार, नाशिक-मुंबईचा प्रवास आणखी सुसाट होणार, वाचा सरकारचा मास्टरप्लान

Hair Care : घरगुती उपायांनी करा पांढरे केस काळे, जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT