Dharavi Police station Saam TV
मुंबई/पुणे

Dharavi Crime News: क्रूरतेचा कळस! २० वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; धक्कादायक घटनेनं धारावी हादरली

20 Year Old Girl Was Burnt Alive: यात तरुणी ६०% ते ७०% भाजली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai Crime News: मुंबईच्या धारावी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झालाय. यात तरुणी ६०% ते ७०% भाजली आहे. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केला आहे. यात तरुणी ७० टक्के भाजल्याने तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण धारावी (Dharavi) हादरून गेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर पटेल (वय ४१) असं आरोपीचं नाव आहे. आरोपीवर भा दं वि ३०७ (हत्येचा प्रयत्न) कलम दाखल करत अटक केली आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतही (Delhi) अशीच एक क्रूर घटना घडाली होती. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी एका १६ वर्षीय चिमुकलीवर भररस्त्यात वार करण्यात आले. त्यानंतर नराधमाने तिच्या डोक्यात दगडही घातला. ही संपूर्ण घटना घडली तेव्हा रस्त्यावर बघ्यांची गर्दीही जमली होती. मात्र कोणीही पीडितेच्या मदतीसाठी पुढे आले नाही. या हृदयद्रावक घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात धक्का; माजी मंत्र्यांच्या बंधूंचा तडकाफडकी राजीनामा; पत्रात सांगितली मनातली खदखद

Home Vastu Tips: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

ज्या मुलाला दत्तक घेतलं, त्याच्याच बायकोनं वृद्ध सासूला मध्यरात्री रस्त्यावर सोडलं

Bike Stunt : 'मौत का कुआ'मध्ये स्टंटबाजी करताना भीषण अपघात, तरुण १५ फूट खाली पडला; घटनेचा थरारक Video Viral

Maharashtra Live News Update: लातूरच्या औसा रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग

SCROLL FOR NEXT