महेंद्र वानखेडे, वसई
वसई विरार मिरा भाईंदर गुन्हे शाखा तीनच्या पथकाने कोट्यवधींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या अट्टल गुन्हेगार टोळीने 4 करोड 87 लाखांची रोकड लंपास केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार मुंबईतील धारावी परिसरात तथाकथित समाजसेवक म्हणून कार्यरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १७ मार्चला गुजरातमधील एक व्यापारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरत येथून मुंबईच्या दिशेने कारमधून जात होता. त्यावेळी खानिवडे टोल नाक्यावर पुढे एका कारमधून पाच व्यक्ती खाली उतरले.
त्यांनी व्यापाऱ्याची कार थांबवली आणि आम्ही पोलीस आहोत तू कारमधून बाहेर ये असं त्याला बोलू लागले. मात्र हे चोर असल्याचं व्यपाऱ्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याने कारमधून खाली उतरण्यास नकार दिला. नकार दिल्याने चोरट्यांनी त्याला शिविगाळ आणि मारहाण करत खाली उतरवले. त्यानंतर चोरट्यांनी कारची चोरी केली.
या प्रकरणी मांडावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर प्रकरण असल्याने हा तपास गुन्हे शाखा तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. साक्षीदार,महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिकदृष्ट्या तपास करत गुन्हा उघडकीस आणला.
या आरोपीकडून एकूण ५ कोटी ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्य सूत्रधार मुंबईतील धारावी परिसरातून मुरगनंदन अभिमन्यू, बाबू मोडा स्वामी, मनिककंडन चलैया, बालाप्रभु शनमुगम यांना अटक करण्यात आलीये. या चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अद्याप तीन संशयीत आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.