Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: राजकीय पक्षाचा आशीर्वाद की आर्थिक साटेलोटे? मुंबई झोपडपट्टी पुनर्विकासाची जबाबदारी एकाच इंजिनीअरवर

Crime News: दुय्यम अभियंत्यांच्या हातातील काम काढून ते एकाच दुय्यम अभियंत्याच्या खांद्यावर सोपवले आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai News:

मुंबईतील झोपडपट्टी आणि पुनर्विकासातील इमारतींचे पुनविकास करण्यासाठी 33 (10) आणि 33 (11) या बृहन्मुंबई महापालिका विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत प्रत्येक प्रभागात 2 या प्रमाणे एकूण 26 दुय्यम अभियंते काम करत आहेत. मात्र आता या सर्व दुय्यम अभियंत्यांच्या हातातील काम काढून ते एकाच दुय्यम अभियंत्याच्या खांद्यावर सोपवले आहे. (Latest Marathi News)

तसे पत्रच 23 ऑगस्ट रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव यांनी काढले आहे. मात्र हे करत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्या बाबतची चर्चा एस आर ए कार्यालयात सुरू झाली असून ज्या दुय्यम अभियंत्याच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे याला कोणत्या राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने ही जबाबदारी मिळाली तर नाही ना? अशी ही कुजबुज इतर दुय्यम अभियंते आणि सहाय्यक अभियंत्यांमध्ये रंगली आहे.

एस आर ए प्राधिकरणाने केलेला या नवीन नियमांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात 33 (10) आणि 33 (11) या योजनांवर काम करणाऱ्या सर्व दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हे सर्व अभियंते लवकरच सीईओ सतीश लोखंडे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार असून संबंधित आदेश देखील रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे समजते.

दरम्यान, यापूर्वी देखील 18 सहाय्यक अभियंत्यांचे काम एकाच सहाय्यक अभियंत्यावर सोपवण्यात आले आहे. एस आर ए अंतर्गत 33 (11) नुसार सध्या मुंबईत 200 पेक्षा अधिक योजना सुरू आहेत या सर्व योजनांचे काम एकाच दुय्यम अभियंत्याच्या हाती सोपवण्यात आले आहे. जर सचिवांनी काढलेला आदेश रद्द झाला तर 26 दुय्यम अभियंत्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात 33 (10) नुसार एकूण चौदाशे प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी साडेसहाशे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू देखील झाले आहेत. तसेच 33 (11) नुसार एकूण 200 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून ही दोन्ही मिळून साडेआठशे प्रकल्प सध्या सुरू आहेत.

मात्र या सर्व प्रकल्पांचा भार एक सहाय्यक अभियंता आणि एक दुय्यम अभियंता यांच्यावर सोपवल्यामुळे कामाची गती आणि प्रक्रिया संथ गतीने होऊ शकते. त्यामुळे या सर्व प्रकल्पांच्या कामांचे विभाजन 18 सहाय्यक अभियंते आणि 26 दुय्यम अभियंते यांच्यामध्ये विकेंद्रित होणे गरजेचे असल्याचे एसआरएतील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

Pressure Cooker Cleaning: प्रेशर कुकरच्या शिटीमध्ये घाण साचलीये? या सोप्या पद्धतीने 2 मिनिटांत करा साफ!

Weather Update: 60KMPH वेगाचा सोसाट्याचा वारा अन् मुसळधार धारा; 5 दिवस 7 राज्यात धुव्वाधार पाऊस

SCROLL FOR NEXT