mumbai crime news  saam tv
मुंबई/पुणे

उदयपूर हत्या प्रकरणावर फेसबुक पोस्ट केल्याने तरुणीला धमकी; आरोपीला थेट काश्मीरमधून अटक

राजस्थानच्या (Rajsthan) उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हल्लेखोरांकडून हत्या झाल्यानंतर देशात खळबळ उडाली होती.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

मुंबई : राजस्थानच्या (Rajsthan) उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हल्लेखोरांकडून हत्या झाल्यानंतर देशात खळबळ उडाली होती. याच शिवणकाम व्यावसायिक कन्हैया लाल यांच्या हत्याबाबत फेसबुक (Facebook) पोस्ट केल्याने मुंबईतील गोरेगाव येथील १६ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला थेट जम्मू काश्मीरमधून अटक (Arrest) केली आहे. (Mumbai Crime News In Marathi )

आरोपी फयाज अहमद गुलाम मोहम्मद भट हा ३० वर्षीय आरोपी असून जम्मु काश्मीरच्या उमराबाद येथील रहिवासी आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेल्या तरुणीने तिच्या फेसबुक वॉलवर कन्हैया लाल यांच्या हत्येबाबत काही मतं व्यक्त केली होती. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिला व्हॉट्सअॅप कॉल केला आणि पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या मतांबद्दल तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने या गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसाचे पोलीस पथक श्रीनगर, जम्मु काश्मीर यथे रवाना झाले. पोलीस पथकाने जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आरोपी फयाज भट चा शोध घेतला व त्यास उमाराबाबाद येथून ९ जुलै रोजी रात्री अटक केली. सोमवारी मुंबईमधील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT