भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (दि.२२) तारखेला वरळी परिसरातील राहत्या घरात डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी गळफास घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि डॉ. गौरी या दोघांचं लग्न ७ फेब्रुवारी रोजी झालं होतं. अवघ्या १० महिन्यांत त्यांनी आयुष्य संपवलं. डॉ. गौरी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अनंत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दरम्यान, या घटनेवर अनंत गर्जे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पती अनंत गर्जे यांची पहिली प्रतिक्रिया
गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे यांनी म्हटलं की, 'घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी आलो तेव्हा दरवाजा बंद होता. मी घाबरून ३१ व्या मजल्यावरील खिडकीतून ३० व्या मजल्यावर उतरून प्रवेश केला. तेव्हा समोरचं चित्र पाहून धक्का बसला. गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. मी तात्काळ तिला खाली उतरवून रूग्णालयात नेले', अशी माहिती अनंत गर्जे यांनी दिली.
अनंत गर्जे यांचं बाहेर संबंध असल्याची माहिती
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय डॉ. गौरी यांना होता. या कारणावरून अनंत आणि डॉ. गौरी यांच्यात सातत्याने वाद होत असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे डॉ. गौरी मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. या कारणामुळे डॉ. गौरी यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे का? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमागची कारणं आणि खुलासे समोर येत आहेत.
पंकजा मुंडे यांनी कार्यक्रम केले रद्द
ही घटना उघडकीस येताच मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दरम्यान, डॉ. गौरी यांचा मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर, आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.