Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! रागाच्या भरात दोन महिलांवर चाकूने सपासप वार; मुंबईतील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Crime News: आज पुन्हा एकदा एका चाकू हल्ल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

Ruchika Jadhav

Mumbai News: राज्यात सर्वत्र महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. महिलांवर अन्याय अत्याचाराच्या भयंकर घटना सातत्याने समोर येत आहेत. काल पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयता हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा एका चाकू हल्ल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. (Latets Marathi News)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) देवनार परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीने दोन महिलांवरती क्रूरतेने चाकू हल्ला केलाय. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यात काजल भोसले या महिलेचा मृत्यू झाला असून वैशाली पवार ही महिला जखमी आहे. यांच्यातल्या भांडणाचं कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी देवनार पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेकडून तरुणाचे अपहरण

प्रेम प्रकरणातून मन दुखावल्यावर तरुण तरुणी कसलाही विचार न करता मोठी पाऊले उचलत आहेत. पुण्यातील कालची घटना ताजी असतानाच एका महिलेने तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

लग्न (Marriage) करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने चक्क तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाने लग्नास नकार दिल्याने या महिलेने २ जणांना सुपारी देत तरुणाचे अपहरण केले. पुण्यातील कोंढवे धावडे परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेसह प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक|VIDEO

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, निकालानंतरही बंगलामध्ये हत्येचं सत्र सुरूच

SCROLL FOR NEXT