Akola Crime News : गाेधन वाहतूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई

Borgaon Manju Police Station :पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Akola Crime News,  borgaon manju police station
Akola Crime News, borgaon manju police stationsaam tv
Published On

- हर्षदा सोनोने

Akola Crime News : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या निर्दयपणे कोंबुन कत्तल करीता जाणारे दोन वाहने जात असताना पोलिसांनी सापळा रचून चार गोवंशाना जीवदान दिले. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Akola Crime News,  borgaon manju police station
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर नाकाबंदी करत असताना मुर्तिजापूरकडून मालवाहू वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये दोन बैल वाहनात निर्दयपणे कोंबुन बांधलेल्या स्थितीत आढळून आले. त्या पाठीमागून येणा-या अन्य एका मालवाहू गाडीला थांबवून पोलिसांनी अधिक चौकशी करून तपासणी केली असता. त्यात दोन बैल अवैधरित्या निर्दयपणे कोंबुन बांधलेल्या स्थितीत आढळून आले.

Akola Crime News,  borgaon manju police station
Wardha News : हिंगणघाटातील तणाव निवळला, आरएसएसच्या वर्धा जिल्हा संघचालकांना मारहाणप्रकरणी एक जण पाेलिसांच्या ताब्यात, युवकांचा शाेध सुरु

दरम्यान पोलिसांनी गोवंश वाहतूक प्रकरणी अधिकृतपणे कागदपत्रे मागितली असता संबंधितांना अधिकृत परवाना किंवा कुठलेही दस्तऐवज चालकाला सादर करता आले नाहीत. पाेलिसांनी मालवाहू टाटा गाडीसह चार बैल असा साडे चार लाखांचा ऐवज हस्तगत करुन चार गोवंशाना बोरगाव मंजू पोलिसांनी (police) ताब्यात घेऊन जीवदान दिले.

या प्रकरणी पाेलिसांनी सैय्यद शाकीर, योगेश हरणे, समिर उद्दीन या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्राणी स्वरक्षण कायदा अंतर्गत विविध कल्मान्वे गुन्हा दाखल केला. तसेच गोधन गोरक्षण संस्थेत दाखल केले. पुढील तपास ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Akola Crime News,  borgaon manju police station
Praveen Darekar News : प्रवीण दरेकर आदित्य ठाकरेंवर बरसले; शेंबड्या पोरानं मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं (पाहा व्हिडिओ)

एकाच वाहनाचे दोन नंबर कसे?

अवैधरित्या गोधन वाहतूक करणाऱ्या मालवाहू टाटा गाडी क्रंमाक एम एच 30 एफ ६०५३ नंबर प्लेट समोर आहे तर पाठीमागे याच गाडीचा एम एच ४८ जी ०० अर्धवट बनावट गाडी क्रंमाक तपासातून पोलिसांना आढळून आला हा एकाच वाहनाचा बनावट क्रंमाक कसा? पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.....!

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com