- चेतन व्यास
Wardha Crime News : वर्ध्यावरून बसने प्रवास करीत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर खाली उतरवीत जेष्ठ नागरिकास मारहाण केली. सुमारे आठ ते दहा युवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत (jethanand rajput) यांना मारहाण झाल्याची पाेलिसांत नाेंद झाली आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. (Maharashtra News)
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तसेच त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनूसार जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाट कडे प्रवास करत होते. बसमध्ये एका दम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्ती गेले. वादातील संबंधित युवकांने त्यांना शिवीगाळ केली. सोबतच त्याच्या मित्रांना हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर येथे बोलावत नांदगाव येथे बस थांबवून जेठानंद राजपूत यांना बसखाली उतरवून 8 ते 10 जणांनी मारहाण केली.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेत संशयित आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरात एसआरपी तसेच पोलिसांची कुमक बोलवत वातावरण शांत करण्यात आले.
घटनेनंतर सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल करण्यात आले. याबाबत सुद्धा पोलिसांकडून माहिती घेतली जातं आहे. सायबर टीम रात्रीपासून हिंगणघाट शहरात सोशल मीडियावर भडकविणारे संदेश पाठविणाऱ्यांचा शोध घेत आहे.
रात्री शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी परिस्थिती हाताळून घेत संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी (police) नागरिकांना कोणत्याही अफ़वावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.