RAJSHREE MORE POSTS VIDEO OF MNS LEADER’S SON ABUSING  Saam tv news
मुंबई/पुणे

MNS: XXX पैसे घे अन् चल निघ.. मनसे नेत्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत राडा; मराठी इन्फ्लूएन्सरला भररस्त्यावर शिवीगाळ, VIDEO व्हायरल

Rajshree More Posts Shocking Video of MNS Leaders Son: अंधेरीत अपघातानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे आणि मनसे नेत्याच्या मुलामध्ये वाद. अपशब्द, धमक्या आणि माफी मागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Bhagyashree Kamble

संजय गडदे, साम टीव्ही

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री राखी सावंतच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या राजश्री मोरे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख आणि राजश्री यांच्यात वाद होताना दिसत आहे.

रविवारी रात्री राजश्रीच्या वाहनाचा अपघात घडला. राहिल शेख दारू पिऊन कार चालवत होता आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप राजश्रीने केला. या घटनेनंतर तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये राहिल राजश्रीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसून येत आहे. तसेच धमकी देत आहे. नंतर तो माफीही मागतो. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

ही घटना रविवारी रात्री मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. राजश्री आपली कार घेऊन जात होती. या दरम्यान, तिच्या कारचा अपघात झाला. राहिल शेख मद्यधूंद अवस्थेत कार चालवत होता आणि यामुळे कारचा अपघात झाल्याचा आरोप राजश्रीने केला. यानंतर राहिलने राजश्रीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. राजश्रीने तातडीने व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. तसेच 'XXXपैसे घे आणि निघ. हवंतर पोलिसांना सांग; मी जावेद शेख यांचा मुलगा आहे. मग काय होईल हे तुला लवकरच कळेल', अशी धमकी देताना दिसत आहे.

नंतर त्या ठिकाणी पोलीस येतात. यादरम्यान, तो पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राजश्रीने राहिलविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर मनसेकडून वारंवार धमक्या येत असल्याचं तिने सांगितलं. व्हिडिओ व्हायरल होताच यावर नेटकऱ्यांच्या संमिश्री प्रतिक्रिया उमटत आहे.

आधीही राजश्री तिच्या एका व्हिडिओ चर्चेत आली होती. महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे, मनसेच्या भूमिकेवर तिने संताप व्यक्त केला होता. तिने व्हिडिओमध्ये इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी अधिक मेहनत करावी, असं तिने म्हटलं होतं. स्थलांतराशिवाय मुंबईतील मराठी लोकांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा दावा तिने व्हिडिओतून केला. तिच्या वादग्रस्त विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर राजश्रीने माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

JioPC: टीव्हीला संगणक बनवा JioPC च्या किफायतशीर प्लॅनसह, फक्त ५९९ रुपयांत

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनला लाडकीला ओवाळणी मिळणार! २९८४ कोटींचा निधी वर्ग, खात्यात ₹३००० खटाखट येणार?

अर्धा लिंबू, कुंकू अन् टाचण्या.. अजित पवार गटातील नेत्याच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT