Mumbai Crime news Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime news: WhatsApp कॉल करून बँक खाते करायचे रिकामे; असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

नागरिकांना कारवाईच्या भीतीपोटी लुटणाऱ्या बोगस पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश मिळाले आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: पोलीस ठाण्यातून बोलतोय, तुमच्या नावे आलेले पार्सल तुमचे आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या.. तुमच्या नावे आलेल्या पार्सल मध्ये अमली पदार्थ किंवा हत्यार आढळून आले असल्याचे फोन करणारा व्यक्ती हा बोगस पोलीस असू शकतो. कारण अशा प्रकारे फोन करून नागरिकांना कारवाईच्या भीतीपोटी लुटणाऱ्या बोगस पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश मिळाले आहे. (Latest Marathi News)

तंत्रज्ञानाचा फायदा सामान्य नागरिकांप्रमाणेच सायबर गुन्हेगारांनी काहीसा अधिक घेतला असल्याचं देशभरातील अनेक घटनांवरून लक्षात येतं. कधी गुगल पे गिफ्ट, कधी विद्युत बिल न भरल्याने विद्युत पुरवठा मेसेज, कधी इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाने मोठे रिटर्न्स तर कधी सेक्सटोर्शन तर कधी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर पॅन कार्ड डिटेल्स मागून नागरिकांची फसवणूक केली जात असे. आता चक्क तुमच्या कुरियरमध्ये अमली पदार्थ किंवा हत्यार असल्याचे सांगून नागरिकांना घाबरवणारे व्हाट्सअप किंवा स्काईप कॉल करून लाखोंना गंडवण्याचे सायबर गुन्हेगारांनी तंत्र अवलंबले आहे.

फरीदायी नावाच्या कुरिअर कंपनीमधून आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आल्या बाबतची तक्रार मुंबई पोलिसांना मिळाली होती. मात्र हे तक्रारच बोगस असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यानंतर बांगुर नगर पोलिसांनी खोलात जाऊन शहानिशा केली असता नागरिकांना अशाप्रकारे अमली पदार्थ आणि हत्यारांची भीती दर्शवून मुंबईप्रमाणेच राज्याच्या व राज्याबाहेरील अनेक ठिकाणी फसवले गेले असल्याचे गुन्हे नोंद झाले होते.

यानुसार बांगुर नगर पोलिसांनी सुमोटो कारवाई करून अशा बोगस पोलिसांच्या टोळीचा पडदा पास करून पाच जणांना अटक देखील केली आहे. आरोपींकडून 4 मोबाईल, 2 लॅपटॉप, 13 चेकबुक, 14 एटीएम, 1 राउटर, 4 सिमकार्ड, 2 स्टॅम्प, 3 पेन कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

चीनच्या सायबर ठगांप्रमाणे मुख्य या आरोपीचा हातखंडा असलयाचे समोर आला आहे.आरोपींच्या फसवणुकीचे दीड कोटी रुपये गोठवण्यात आले. आरोपींकडून 4 मोबाईल, 2 लॅपटॉप, 13 चेकबुक, 14 एटीएम, 1 राउटर, 4 सिमकार्ड, 2 स्टॅम्प, 3 पेन कार्ड जप्त करण्यात आले आहेत.त्यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आणि त्यांच्या गुंडांच्या टोळीत आणखी किती लोक सामील आहेत, याचा तपास बांगुनगर पोलीस करत आहेत.

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संजय नीलकंठ मंडल (२६), अनिमेश अजितकुमार वैद्य (२२) कोलकाता आणि महेंद्र अशोक रोकडे, (३६) मुकेश अशोक दिवे (२८) यांना टिटवाळा पोलिस ठाण्यातून अटक केली. या सायबर गुंडाचा मुख्य सूत्रधार श्रीनिवास राव सुब्बाराव दादी (४९) याला निजामपेठ हैदराबाद तेलंगणा येथून अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT