बंजी जंपिंग करतानाचा हा व्हिडिओ...ही दृष्य पाहूनच बघणाऱ्याच्याही अंगावर काटा येतो...आणि ही तरुणी बिनधास्तपणे एडवेंचर करतेय...या व्हिडिओत बघा, ती जशी वरती ज्या वेगाने जाते तितक्याच वेगाने ती खाली येतेय...यावेळी तिची मान आणि पाठीचा कणा मोडल्याने तिचा मृत्यू झाला असा दावा करण्यात आलाय...आता पुन्हा एकदा बघा, किती भयानक ही राईड आहे...यात या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...कारण, अनेकजण अॅडव्हेंचर राईड करत असतात, त्यामुळे याचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...
हा व्हिडिओ ऋषिकेशमधील असल्याचा दावा केलाय...एका पार्कमध्ये दोरीचा वापर करून अॅडव्हेंचर सुरू आहे...पण, हे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...व्हिडिओत दिसणारी तरुणी कोण आहे...? खरंच तिचा मृत्यू झालाय का...? हे पाहताना आम्हाला एक व्हिडिओ सापडला...
स्वत: फिजाने आपण ठणठणीत असल्याची माहिती दिली...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणीचा मृत्यू झालेला नाही
उदयपूरची फिजा खान ठणठणीत
राईडवेळी मान, पाठीचा कणाही मोडलेला नाही
व्हिडिओ राजस्थानच्या माउंट अबूचा
साहसी खेळ खेळताना काळजी घ्यावी
याला बंजी जंपिंगसह रॉकेट इजेक्टर असंही म्हणतात...सध्या अनेक जण साहसी खेळ खेळतात...यामुळे जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो... फिजानेही रॉकेट इजेक्टर नावाचा एडव्हेंचर राईड केली...तिला दुखापत झालेली नाही. तरीही, लोक व्हिडिओ शेअर करून तिच्या मृत्यूचा दावा करतायत...मात्र, आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय...फिजा खान ही सुरक्षित आहे...पण, तुम्ही असे साहसी खेळ खेळताना काळजी घ्या, याने जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.