mumbai crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: माजी नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर २९ वर्षीय महिलेने अत्याचारचा गुन्हा दाखल केला आहे.

सूरज सावंत

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर २९ वर्षीय महिलेने अत्याचारचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अँटॉप पोलीस ठाण्यात मंगेश सातमकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर २९ वर्षीय महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर महिलेने पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून सातकर यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी सातमकर यांच्या विरोधात 376 (2) (N), 312, 420, 504, 506 (2) अंतर्गत पुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस अधिक तपास करत आहे.

पीडितेचा आरोप काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश सातमकर यांनी त्यांच्या घरी कोणी नसताना पीडीतेवर अत्याचार केला. तसेच पीडितेला लग्नाचे आमिष दिले. गेल्या वर्षी मंगेश सातमकर हे पीडितेला घेऊन लोणावळ्याला घेऊन गेले होते. लोणावळ्यातही अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

मंगेश सातमकर यांच्या अत्याचारामुळे गर्भवती झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर मंगेश सातमकर यांनी गर्भपाताच्या गोळ्याचा खाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप केला. मात्र, मंगेश सातमकर यांच्याकडून दररोज गर्भपाताच्या गोळ्या खाल्यामुळे पीडितेच्या मृत्रपिंडाला सूज आल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झालं आहे.

दरम्यान, पीडित महिलेने सामाजिक संस्थेशी मदत मागितली. त्यानंतर पीडित महिलेने माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्याविरोधात अँटॉप हिल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधकांचे दिवस संपले! राणा जगजितसिंह पाटील यांचा हल्लाबोल|VIDEO

Bihar Election : नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर संपली! भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणार का? महत्त्वाचं कारणं

Children Day 2025: या विकेंडला मुलांना घेऊन जा मुंबईतील 5 प्रसिद्ध ठिकाणी, मुलं होतील भरपूर खूश

Bihar Election Results: बिहारमध्ये काँग्रेस भुईसपाट का झाली? ही चार कारणे|VIDEO

Ensure Diabetes Care: डायबिटीज मॅनेजमेंटसाठी प्रगत उपाय! एन्‍शुअर डायबिटीज केअरमुळे होऊ शकतो मोठा फायदा

SCROLL FOR NEXT