BMW Car  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: बापरे! मुंबईतून तब्बल ८० लाखांची BMW कार चोरीला, घटना CCTV मध्ये कैद

BMW Car Theft In Dadar: मुंबईतील नामांकित बॅस्टियन रेस्टॉरंटच्या कार पार्किंग मधून BMW Z4 ही कार चोरी झाली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Priya More

मुंबईतल्या दादर परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेली आलिशान बीएमडब्ल्यू कार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील नामांकित बॅस्टियन रेस्टॉरंटच्या कार पार्किंग मधून BMW Z4 ही कार चोरी झाली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. याप्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या कोहिनूर स्क्वेअर या बिल्डिंगच्या ४८व्या मजल्यावर बॅस्टियन रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये रोहन फिरोज खान (३४ वर्षे) हा तरुण आपल्या मित्रांसोबत गेला होता. रोहनने आपली बीएमडब्ल्यू कार पार्किंग अटेंडटला पार्किंगमध्ये लावण्यास सांगितली होती. कार पार्किंगमध्ये लावताच एका अज्ञात कारमधून आलेल्या अनोळखी व्यक्तीने ही कार अनलॉक करत चोरी केली.

रोहनने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजी पार्क पोलिसांनी बीएनएस कायद्याच्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोहन खान या बांधकाम व्यावसायिकाने आपली लाल रंगाची बीएमडब्ल्यू कार २७ ऑक्टोबर रोजी दादर येथील कोहिनूर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दुपारी १ वाजता पार्क केली होती. त्याने कारची चावी पार्किंग अटेंडंटला दिली आणि नंतर तो रोहित गोविंदानी आणि शारेक मोमीन या मित्रांसह बॅस्टिन हॉटेलमध्ये गेला.

बॅस्टिन हॉटेल बंद झाल्यानंतर रोहन खान आणि त्याचे मित्र गप्पा मारत बाहेर आले होते. रोहन खानने पार्किंग अटेंडंटला त्यांची कार आणण्यास सांगितल्यावर अटेंडंट बराच वेळ आला नाही त्यामुळे तो चिंतेत आला. पार्किंग कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी कार पार्क केलेल्या जागेवर नसल्याचे सांगितले. रोहन

खानने त्याच्या मित्रांसह आणि पार्किंग कर्मचाऱ्यांसह परिसरात शोध घेतला पण कार सापडली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कार चोरीची घटना कैद झाली. या सीसीटीव्हीत दिसत आहे की, एका अज्ञात व्यक्तीने दुपारी २ च्या सुमारास बीएमडब्ल्यू कार चोरली. त्यानंतर रोहन खानने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT