Jogeshwari Crime: Saamtv
मुंबई/पुणे

Jogeshwari Crime: धक्कादायक घटना! गळ्याला चाकू लावून धमकावत रिक्षा चालकाला लुटले; दोघांना अटक

jogeshwari News: दोन्ही आरोपींनी हात दाखवून त्यांची रिक्षा थांबवली आणि पवई येथे जायचे आहे असे सांगून रिक्षात ते रिक्षात बसले.

Gangappa Pujari

संजय गडदे; प्रतिनिधी...

Mumbai Crime News: रिक्षा चालकाच्या गळ्यावर चाकू लावून मोबाईल व रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड घडली आहे. अभिषेक राजेश तुरे आणि परेश बाबुराव मांडवकर असे या आरोपींचे नावे असून या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रिक्षाचालक अरुण कुमार बिंद हे गोरेगाव येथील भाडे सोडून भांडुपकडे (Bhandup) जात होते. यावेळी त्यांना दोन अनोळखी इसमांनी हात दाखवून त्यांची रिक्षा थांबवली आणि पवई येथे जायचे आहे असे सांगून रिक्षात बसले.

रिक्षा जे.व्ही.एल.आर. रोडने पवईच्या रामवाडी परिसरात आली असताना पाठीमागे बसलेल्या एका इसमाने रिक्षाचालकाच्या गळ्यावर चाकू लावला. यावेळी दुसऱ्या इसमाने रिक्षाचालकाच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असे एकूण १२९०० किमतीचा मुद्देमाल चोरी केला.

या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच हे दोन आरोपी अभिलेखावर असल्याचे उघड झाले. तसेच आरोपींचे फोटो रिक्षा चालकाला दाखवण्यात आले आणि आरोपींची ओळख निष्पन्न झाली. अभिषेक राजेश तुरे आणि परेश बाबुराव मांडवकर असे या आरोपींचे नावे असून एकाला प्रेमनगर येथून अटक केली तर दुसऱ्या आरोपीला`गुंफा रोड येथून अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT