Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : जिथे केली दहशत तिथेच उतरवला माज! भाईगिरीचे क्लास घेणाऱ्या भाईची पोलिसांनी काढली हवा

मुंबईत अनेक तरुणांच्या डोक्यात भाई बनण्याची हवा शिरलेली आहे. मात्र अशा अनेक भावी भाईना मुंबई पोलिसांनी वठनीवर देखील आणले आहे.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai News: मुंबईत अनेक तरुणांच्या डोक्यात भाई बनण्याची हवा शिरलेली आहे. मात्र अशा अनेक भावी भाईना मुंबई पोलिसांनी वठनीवर देखील आणले आहे. मुंबईच्या कुरार पोलिसांनी देखील अशाच एका भावी भाईला बेड्या ठोकल्या आहेत जो परिसरातील नागरिकांना आपल्या कमरेला लटकवलेले पीस्टल दाखवून घाबरवत असे आणि भाईगिरी क्या होती है ये कोई हम से सीखे असे म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. (Latest Marathi news)

शिवाय अनेकांकडून त्याने खंडणी देखील उकळण्याचा प्रयत्न केला होता. युनुस नासिर सय्यद (३८ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालाड पूर्वे कडील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर परिसरात राहणारा एक तरुण संजय नगर परिसरातील आपल्या मित्रांना भाईगिरी कशी शिकायची, भाईगिरी कशी करायची, समाजात दहशत (Crime News) कशी पसरवायची ? याबाबत शिकवणी देत होता.

ही बाब कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे यांच्या एक नंबर 1 व्हॅन वरील ड्रायव्हर निलेश यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली होती. यानुसार कुरार पोलिसांच्या एक टीमने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा संजय नगर परिसरात तरुण आपल्या सहकारी मित्रांना कमरेला लटकवलेले पेस्टल दाखवून सतत त्याच्या आवडीचा तो डायलॉग बोलायचा भाईगिरी क्या होती है कोई हम से सीखे.

हे सतत पाच दिवस सुरू होते मात्र कुरार पोलिसांच्या (Mumbai Police) टिमला जेव्हा समजलं की त्या तरुणाकडे खरोखरीच पिस्टल आहे तेव्हा पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अमेरिकन बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काढतोस तसेच काही रिकाम्या मॅक्झिन देखील जप्त केल्या आहेत.

आरोपी हनुमान नगर वडार पाडा येथे राहणारा असून त्याने हे पिस्टल मध्यप्रदेश मधून खरेदी केले होते याच क्रिस्टलच्या मदतीने त्याला मुंबईत खंडणी वसूल करण्याबरोबरच भाईगिरी देखील करायची होती. सध्या आरोपी कुरार पोलिसांच्या ताब्यात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJI Attack : देश जाती, धर्मावर चालतो... संविधान मला मान्य नाही; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे वक्तव्य

Friday Release: हा विकेंड होणार धमाकेदार, 'या' आठवड्यात मिळणार सस्पेन्स आणि रोमान्सचा डबल डोस

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

SCROLL FOR NEXT